मंडल आंदोलनात ओबीसी नव्हतेच, भाजपने राजकारण करू नये; बबनराव तायवाडे यांनी केलं आव्हाडांचं समर्थन
मंडल आयोगाच्या आंदोलनात ओबीसी नव्हते हे मंत्री जितेंद्र आव्हाड यांचं विधान बरोबरच आहे. त्यामुळे भाजपने विनाकारण त्याचं राजकारण करू नये.
नागपूर: मंडल आयोगाच्या आंदोलनात ओबीसी नव्हते हे मंत्री जितेंद्र आव्हाड यांचं विधान बरोबरच आहे. त्यामुळे भाजपने विनाकारण त्याचं राजकारण करू नये, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केली आहे.
बबनराव तायवाडे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे. मंडल आयोगाच्या आंदोलनात ओबीसी समाज नव्हता. आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य वास्तवाला धरुन आहे. भाजप यावर राजकारण करत आहे, असं सांगतानाच आव्हाड यांच्याप्रमाणे इतरंही ओबीसी नेत्यांनी ओबीसी समाजाला जागृत करावं. 60 टक्के ओबीसी समाज जागृत झाल्यास तो सत्ताधारी असेल, असं तायवाडे म्हणाले.
तेव्हा ओबीसी मागे होते
ठाण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. मंडल आयोगाची अंमलबजावणी करावी, यासाठी ओबीसी समाजाने लढायला हवे होते. पण, त्यावेळेस मैदानात दलित वर्ग उतरला होता. ओबीसी मात्र मागे होते. कारण, त्यांच्यावर ब्राह्मणवादाचा पगडा आहे. पण, आता आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ओबीसींना मैदानात उतरावेच लागेल, असे आवाहन आव्हाड यांनी केले होते.
बाबासाहेबांच्या राजीनाम्याची जाणीव ठेवा
जोतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले जर नसते तर आज इथे कोणतीच महिला दिसली नसती. महिला कोणत्याही जातीधर्माची असली तरी ती सुशिक्षित झाली त्याचे श्रेय फक्त आणि फक्त सावित्रीमाई यांनाच जाते. कार्ल मार्क्स याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ जर कोणी असेल तर ते जोतिराव फुलेच आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा ओबीसींसाठीच दिला आहे, याची जाणीव तमाम ओबीसींनी ठेवले पाहिजेत. आज ओबीसींचे राजकारण संपवण्याचा प्रयत्न होत आहे. पण, हे आरक्षण संपवणार्या केंद्राविरोधात ओबीसी आक्रमक होत नाहीत. आता लढण्याची वेळ आली आहे. पांगळे होऊ नका, लढा, असे आवाहनही त्यांनी यावेळेस केले.
ओबीसी एकवटू लागले आहेत, हे अत्यंत चांगले आहे. पण, राज्याने इम्पिरिकल डाटा सादर करून ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारवर दबाव आणावा, असे आवाहन आमदार निरंजन डावखरे यांनी केले होते. तर, ओबीसी नेतृत्व अशोक वैती यांनी , एका कार्यक्रमापुरते मर्यादित राहू नये, ठाणे ओबीसी एकीकरण समितीने यापुढेही नियमित एकत्र येणे गरजेचे आहे. जर आपण एकत्र आलो तरच ओबीसींची बिगर राजकीय ताकद उभी राहिल, असे सांगितले.
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज फक्त TV9 Marathi वरhttps://t.co/7JwexyS5J0#BreakingNews | #LiveUpdates | #Corona | #Omicron |
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 4, 2022
संबंधित बातम्या: