मंकीपॉक्सने टेन्शन वाढवलं, नागपुरात 2 रुग्णालयांमध्ये बेड आरक्षित, काय घडतंय?

जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्स आजाराच्या पार्श्वभूमीवर आणीबाणी घोषित केली आहे. जगभरातील शेकडो देशांमध्ये मंकीपॉक्स आजाराचं संक्रमण झालं आहे. त्यामुळे धाकधूक वाढली आहे. भारतातही मंकीपॉक्स आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेतली जात आहे.

मंकीपॉक्सने टेन्शन वाढवलं, नागपुरात 2 रुग्णालयांमध्ये बेड आरक्षित, काय घडतंय?
मंकीपॉक्सने टेन्शन वाढवलं, नागपुरात 2 रुग्णालयांमध्ये बेड आरक्षित
Follow us
| Updated on: Aug 21, 2024 | 5:11 PM

जगभरात खळबळ माजवणाऱ्या मंकीपॉक्स आजाराने आता भारतातही धास्ती वाढवली. विशेष महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात मंकीपॉक्स आजाराता धोका पाहता प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. मंकीपॉक्सच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील नागपूर मेडिकल कॉलेज आणि इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज या दोन्ही रुग्णालयात बेड आरक्षित ठेवण्यात आले आहेत. वैद्यकीय शिक्षण खात्याचे सचिव दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी (20 ऑगस्ट) राज्यातील सर्वच वैद्यकीय महाविद्यालय आणि वैद्यकीय अधीक्षकांची बैठक घेत आरोग्य विभागाने सूचनांवर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

मंकीपॉक्सचे रुग्ण आढळल्यास त्याच्यावर उपचारासाठी मेयो आणि मेडिकल या दोन्ही शासकीय रुग्णालयांमध्ये प्रत्येकी पाच बेड आरक्षित करण्यात आले आहेत. तसेच संशयितांचे रक्ताचे नमुने घेऊन पुणे येथे राष्ट्रीय विषाणू प्रायोगशाळेत पाठवण्यात सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित आजार जास्त फोफावू नये, यासाठी आरोग्य विभागाकडून सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे.

दिल्लीतही हालचाली वाढल्या

देशाची राजधानी दिल्लीतही मंकीपॉक्स आजाराच्या पार्श्वभूमीवर नियोजन केलं जात आहे. मंकीपॉक्सच्या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी दिल्लीतील 6 रुग्णालयांमध्ये सर्व तयारी करण्यात आली आहे. यामध्ये 3 केंद्र सरकारचे रुग्णालय आणि 3 दिल्ली सरकारच्या रुग्णालयांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या एम्स, सफदरजंग आणि आरएमएल या रुग्णालयांमध्ये मंकीपॉक्स आजारावर उपचार होणार आहे. तर दिल्ली सरकारच्या अख्त्यारितील जीटीबी, लोकनायक आणि आंबेडकर हॉस्पिटलमध्ये मंकीपॉक्स आजारावर उपचार केले जाणार आहेत.

मंकीपॉक्सची लक्षणे काय?

डोकेदुखी, ताप येणे, शरीरावर लाग रंगाचे पुरळ येणे, खाज येणे, शरीरावर ठिकठिकाणी गाठी होणे, स्नायू दुखणे हे मंकीपॉक्स आजाराची लक्षणे आहेत. या आजाराने जगभरातील अनेक देशांमध्ये थैमान घातलं आहे. मध्य आफ्रिकेतील डेमोक्रेटिक रिपब्लिक कांगो येथे या आजाराचा पहिला रुग्ण आढळला होता. इथून जगभरातील अनेक देशांमध्ये या आजाराचं संक्रमण झालं. खरंतर हा आजार स्पर्शाने होतं. पण तरीही रुग्णाच्या सातत्याने संपर्कात आल्याने देखील या आजाराची लागण होण्याचा धोका आहे. या आजाराचा मृत्यू दर हा o.1 टक्के इतका आहे. पण सध्या मंकीपॉक्स ‘क्लेड 1b’ हा व्हेरिएंट जास्त धोकादायत असल्याचं समोर येत आहे. या व्हेरिएंटचा मृत्यू जर हा तब्बल 3 टक्के इतका मोठा आहे.

मंकीपॉक्स आजाराचा भारतात 2022 ला पहिला रुग्ण आढळला होता. त्यावेळी भारतात एकूण 30 रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली होती. जागतिक आरोग्यच संघटनेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 2022 पासून आतापर्यंत 116 देशांमध्ये मंकीपॉक्स आजाराचं संक्रमण झालं आहे. तसेच 99,176 रुग्णांना या आजाराची लागण झाली आहे. यापैकी 208 रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.