‘काय हाल, काय परिस्थिती केली, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वाईट वाटतं’, चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

"भाजप उद्धव ठाकरेंना इतका मानसन्मान देत होती, देवेंद्र फडणवीस त्यांचे लहान भाऊ सारखे काम करत होते. आता मविआमध्ये त्यांचे काय हाल झाले आहेत. माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची काय परिस्थिती केली आहे", अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

'काय हाल, काय परिस्थिती केली, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वाईट वाटतं', चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
Follow us
| Updated on: Oct 11, 2024 | 5:48 PM

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली. “भाजप उद्धव ठाकरेंना इतका मानसन्मान देत होती, देवेंद्र फडणवीस त्यांचे लहान भाऊ सारखे काम करत होते. आता मविआमध्ये त्यांचे काय हाल झाले आहेत. माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची काय परिस्थिती केली आहे, ते उद्धव ठाकरेंना घरी बोलवतात. काँग्रेस त्यांना दिल्लीला बोलवते. उद्धव ठाकरे हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करा. वाईट वाटते उद्धव ठाकरे यांच्याबद्दल. आम्ही एवढा मानसन्मान त्यांना दिला. मात्र त्यांनी सर्व माती केली. महाविकास आघाडीचे नेते कधीही उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करणार नाहीत. 2019 मध्ये त्यांना महायुती फोडायची होती म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं. आता उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीची उपयोगिता संपलेली आहे”, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.

“ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सकाळी खोटारडेपणा करतात. संजय राऊत म्हणाले होते की, मध्यप्रदेशात लाडकी बहीण योजना बंद आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी 1 कोटी 30 लाख महिलांना योजना सुरळीत सुरू आहे, अशी माहिती दिली. महाराष्ट्रात आमचं सरकार आहे. लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि आमच्या सरकार पुढे येऊन योजना सुरूच राहणार आहे. मात्र जिथे जिथे काँग्रेसचे सरकार आले, त्यांनी योजना बंद केली आहे. संजय राऊत यांनी काँग्रेसशासित कर्नाटक, हिमाचल, तेलंगणा या राज्यांबद्दल बोलले पाहिजे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री स्पष्ट बोलले, संजय राऊत खोटं बोलतात. त्यांच्या विरोधात मध्य प्रदेशात गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीचा खोटारडेपणा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. जनता महाविकास आघाडीला धडा शिकवेल. लाडक्या बहिणीच महाविकास आघाडीच्या नेत्यांना झोडपून काढणार आहे”, असा घणाघात चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

‘भाजप जात पात धर्माचे राजकारण करत नाही’

यावेळी भाजप आणि आरएसएसच्या बैठकीबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. “भाजप जात पात धर्माचे राजकारण करत नाही. हिंदुत्वाची भूमिका आमची प्रखर आहे. आमच्यासाठी हिंदुत्व महत्त्वाचा आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत हिंदुत्वाशी कॉम्प्रोमाइज करणार नाही. या देशात राहून बांगलादेश आणि पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्यांशी आम्ही कधीही जुळणार नाही. या देशाच्या प्रत्येक हिंदू बांधवाशी आमची बांधिलकी आहे. उमेदवारांचा निर्णय जातीपातीच्या आधारावर होणार नाही. तर उमेदवाराचा मेरिट आणि कार्यक्षमता या आधारावर होईल. मेरिटवर उमेदवारी दिली जाईल”, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली.

‘अजित दादांच्या नावाने खोटारडेपणा होतोय’

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. “अजित दादांच्या नावाने खोटारडेपणा होत आहे. त्यांच्याशी संबंधित विषय संपल्यानंतर ते निघाले होते. अजित दादाबद्दल संभ्रम नेहमीच तयार करणे योग्य नाही. ते राज्याचे प्रमुख नेते आहेत. ते कुठल्यातरी कामासाठी गेले असतील”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

बावनकुळेंची राहुल गांधींवर टीका

“मविआच्या नेत्यांचा खोटारडेपणा मतदार नोव्हेंबर महिन्यात उद्ध्वस्त करणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आमचे खासदार निवडून द्या खटाखट निधी घ्या असे म्हणाले, ते खोटे निघाले. आरक्षणबद्दलही राहुल गांधी खोटे बोलले. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वास्तविकतेचा भान ठेवावं. नाना पटोले जागे व्हा. तुम्हाला मुंगेरीलालचे हसीन स्वप्न पडत आहेत. महाराष्ट्राला डबल इंजिन सरकार हवं आहे. तुमचं सरकार कधीही येणार नाही”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

गुन्हे करून आरोपींचं देवदर्शन? घुले-आंधळे गुजरात तर वाल्मिक कराड...
गुन्हे करून आरोपींचं देवदर्शन? घुले-आंधळे गुजरात तर वाल्मिक कराड....
बीड पुन्हा हादरलं... लोखंडी रॉड-धारदार शस्त्र; दोन सख्या भावांची हत्या
बीड पुन्हा हादरलं... लोखंडी रॉड-धारदार शस्त्र; दोन सख्या भावांची हत्या.
सैफवर चाकूचे वार, रक्तबंबाळ, लिलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यानं सांगितलं
सैफवर चाकूचे वार, रक्तबंबाळ, लिलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यानं सांगितलं.
लाडक्या बहिणींनो मोठी बातमी, 2100 कधीपासून मिळणार? सर्वात अपडेट समोर
लाडक्या बहिणींनो मोठी बातमी, 2100 कधीपासून मिळणार? सर्वात अपडेट समोर.
राईटहँड कराड दरबारातून तुरुंगात; मुंडेंना स्वत: घ्यावा लागला जनतादरबार
राईटहँड कराड दरबारातून तुरुंगात; मुंडेंना स्वत: घ्यावा लागला जनतादरबार.
'..तेव्हा का नाही पकडलं', 'त्या' आरोपांवर गुरुमाऊलींच्या मुलाचा खुलासा
'..तेव्हा का नाही पकडलं', 'त्या' आरोपांवर गुरुमाऊलींच्या मुलाचा खुलासा.
VIDEO : सैफच्या पाठीत खुपसलेला चाकूच्या तुकड्याचा हादरवणारा फोटो समोर
VIDEO : सैफच्या पाठीत खुपसलेला चाकूच्या तुकड्याचा हादरवणारा फोटो समोर.
बीड प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार? बंद दाराआड काय चर्चा?
बीड प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार? बंद दाराआड काय चर्चा?.
सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा आणखी एक व्हिडीओ समोर, यात स्पष्ट दिसतंय..
सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा आणखी एक व्हिडीओ समोर, यात स्पष्ट दिसतंय...
सैफवर हल्ला करणारा मुंबईतील 'या' गजबजलेल्या स्टेशनच्या CCTVत कैद अन्..
सैफवर हल्ला करणारा मुंबईतील 'या' गजबजलेल्या स्टेशनच्या CCTVत कैद अन्...