Video Sudhir Mungantiwar : जातीय दंगल होऊ शकते असं म्हणणाऱ्या जयंत पाटलांची चौकशी करावी, नागपुरात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
राज्यात जातीय दंगल होऊ शकते असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलंय. असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जयंत पाटलांची चौकशी करावी, नागपुरात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अशी मागणी केली.
नागपूर : भाजप स्थापना दिवस (BJP Foundation Day) कार्यक्रम शहरातील टिळक पुतळा येथील भाजपा कार्यालयाजवळ पार पडला. यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. संविधान चौकटीत लिखाण स्वातंत्र्य आहे. काही लोकांचा स्वभाव झाला. स्वतःची चूक होते तेव्हा ते स्वतःच्या चुकीच्या समर्थनार्थ न्यायाधीश होतात. आणि दुसऱ्याचे चुकते तेव्हा मग दुसऱ्याच्या चुकीच्या विरुद्ध न्यायाधीश होतात. हा दुटप्पीपणा आहे, अशी टीका संजय राऊत यांच्या वक्तव्यावर केली आहे. राज्यात जातीय दंगल होऊ शकते असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलंय. असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जयंत पाटलांची चौकशी करावी, नागपुरात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी अशी मागणी केली. राज्याचे पोलीस जयंत पाटलांची चौकशी करणार नसतील, तर केंद्रीप पोलीस त्यांची चौकशी करतील, असंही त्यांनी म्हटलं.
महाविकास आघाडी सरकार दुटप्पी
प्रवीण दरेकर यांना नोटीस देतात. त्यावेळी सत्यमेव जयते आणि तुम्हाला नोटीस येतो तेव्हा असत्यमेव जयते. हा दुटप्पीपणा आहे. मनातील वेदना शब्दातून व्यक्त केली आहे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. महाराष्ट्राचे प्रश्न गौण झाले म्हणून की काय स्वतःचे प्रश्न सांगता, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला. शिशूपालाचे शंभर अपराध तसे सरकारच्या 100 समस्या सांगता येईल. जनता श्रेष्ठ नाही आम्ही श्रेष्ठ आहोत, असे सांगतात.
चार मंत्र्यांची सचिवांविरोधात तक्रार
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आता कंगना रणावत आठवत असेल. या निमित्ताने कंगना आणि संजय राऊत याचे समान विचार दिसून येतात. महाविकास आघाडीबाबत ते म्हणाले, महाविकास आघाडीत कुणीच समाधानी नाही. चार मंत्री मुख्य सचिवांविरुद्ध तक्रार करतात. यातून सर्वकाही आलबेल नाही, हेच दिसून येते. महाविकास आघाडीचे आमदार नाराज आहेत. राज्यात केव्हाही स्फोट होऊ शकतो, असंही मुनगंटीवार म्हणाले.