नागपूरमध्ये घरात भीषण स्फोट, तिघे जखमी, नेमके कारण अस्पष्ट

नागपूरच्या चितार ओळमधील गजानन बिंड यांच्या घरी सकाळी 5.30 वाजता अचानकपणे स्फोट झाला. यामध्ये बिड यांच्या घरातील तीन सदस्य किरकोळ जखमी झाले. या मध्ये घरातील हॉल, स्वयंपाक घर, बेडरूम हॉलचे मोठे नुकसान झाले आहे. हा स्फोट कशामुळे झाला हे स्पष्टपणे समजू शकलेले नाही.

नागपूरमध्ये घरात भीषण स्फोट, तिघे जखमी, नेमके कारण अस्पष्ट
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 4:32 PM

नागपूर : नागपूरच्या चितार ओळमधील गजानन बिंड यांच्या घरी सकाळी 5.30 वाजता अचानकपणे स्फोट झाला. यामध्ये बिंड यांच्या घरातील तीन सदस्य किरकोळ जखमी झाले. या मध्ये घरातील हॉल, स्वयंपाक घर, बेडरूमचे मोठे नुकसान झाले. हा स्फोट कशामुळे झाला हे स्पष्टपणे समजू शकलेले नाही.

अचानकपणे स्फोट, तिघे जखमी

मिळालेल्या माहितीनुसार चितार ओळमधील गजानन बिंड यांच्या घरात पहाटे अचानकपणे स्फोट झाला. स्फोट कशामुळे झाला हे स्पष्टपणे समजू शकलेले नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार घरातील इलेक्ट्रिक बटन सुरू केल्यानंतर हा स्फोट झाला. स्फोट अचानकपणे झाल्यामुळे घरातील तीन सदस्य जखमी झाले. ही घटना घडल्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली. तसेच परिसरातील नागरिकांनी बचावकार्य करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती होताच अग्निशमन दलाचा गाड्यादेखील तेथे पोहोचल्या. या घटनेत तीन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. सध्या श्वानपथक, विधुत प्रवाह पथक आणि घरगुती गॅस सिलिंडर पथकाद्वारे या घटनेची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

परिसर दाट लोकस्तीचा, अनर्थ टळला

दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे. हा स्फोट इतका मोठा होता की घरामागील भिंत कोसळली. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. चितारओळी हा परिसर दाट लोकवस्तीचा आहे. स्फोट झाल्यानंतर आग नियंत्रणात आली नसती तर मोठी दुर्घटना या ठिकाणी झाली असती, असे येथील कोकांकडून सांगण्यात येत आहे.

औरंगाबादेत ट्रकला भीषण आग, चालक बचावला

दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर रोडवर (Gangapur Road, Aurangabad)  ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग एवढी भीषण होती की, संपूर्ण परिसरात आग आणि धुराचे लोळ उठत होते. ट्रक चालक रस्त्यावरून जात असताना काहीतरी बिघाड झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने रस्त्याच्या खाली ट्रक घेण्याचा प्रयत्न केला. ट्रक रस्त्याच्या खाली कोसळला.

सुदैवाने चालक बचावला

ट्रक रस्त्याच्या खाली कोसळल्यानंतर त्याला भीषण आग लागली. पाहता पाहता आगीचे मोठे लोळ ट्रकमधून बाहेर पडू लागले. गंगापूर रोडवरील विराज हॉटेल जवळ ही घटना घडली. या आगीमुळे काही काळ रस्त्यावर काळ्या धुराचे साम्राज्य पसरले होते. सुदैवाने ट्रकमधील बिघाड वेळीच लक्षात आल्याने चालकाचे प्राण वाचले.

इतर बातम्या :

VIDEO : उद्धव ठाकरे यांचं घणाघाती भाषण, राणेंच्या प्रत्येक टीकेला उत्तर

सकाळी मलिक म्हणाले 3 जणांना का सोडलं, NCB म्हणते 6 जणांना सोडलं, पहिल्यांदाच कारण सांगितलं

पार्थ पवार ड्रग्ज पार्टीत होते का? सोडलेल्या 6 जणांची नावं काय? समीर वानखेडे म्हणाले

(blast in nagpur three people injured)

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.