Video : Nagpur CBI | नागपुरात सीबीआयचे सर्च ॲापरेशन, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीएवर धाड, काय सापडलं?
अनिल देशमुख यांच्याशी संबंधित धाड असल्याची माहिती आहे. काही महत्त्वाचे पुरावे सीबीआयच्या हाती लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सीए आणि शेअर ट्रेडिंगशी संबंधित व्यक्तीवर ही धाड टाकण्यात आली.
नागपूर : नागपुरात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ‘सीए’च्या घरावर आज सीबीआय ने धाड टाकलीय. विशाल खटवाणी असं या सीएचं नाव असल्याची माहिती समोर आली. नागपुरातील कोराडी परिसरातील (Koradi premises) लॅवरेज ग्रीन परिसरात सीबीआयच्या टीमने सकाळी सात वाजता धाड टाकली. साधारण साडेचार तास सर्च ॲापरेशन राबवल्यानंतर सीबीआय टीम बाहेर पडलीय. आर्थिक गैरव्यवहाराबाबत (financial malpractice) ही धाड टाकल्याची माहिती आहे. अनिल देशमुख यांच्याशी संबंधित धाड असल्याची माहिती आहे. काही महत्त्वाचे पुरावे सीबीआयच्या हाती लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सीए आणि शेअर ट्रेडिंगशी (share trading) संबंधित व्यक्तीवर ही धाड टाकण्यात आली.
कागदपत्र तसेच डिजीटल पुरावे तपासले
कोराडी रोड परिसरातील ग्रीन लॅवरेज ही फ्लॅट स्कीम आहे. येथील ग्राऊंड फ्लोअरला सीएचा एक डुपलेक्स आहे. त्याठिकाणी सकाळी ही धाड टाकण्यात आली. सकाळी सात ते आठ याठिकाणी सीबीआयचे अधिकारी आले. त्यानंतर त्यांनी शोध मोहीम सुरू केली. हे अनिल देशमुख यांचे सीए असल्याची माहिती आहे. त्यामुळं हे सगळ प्रकरण देशमुख यांच्याशी संबंधित असल्याचं सांगितलं जातंय. दोन गाड्यांनी सीबीआयचे अधिकारी-कर्मचारी आले होते. त्यांनी काही कागदपत्रांची तपासणी केली. काही डिजीटल पुरावे गोळा केले.
सकाळपासून चार तास चालले धाडसत्र
ही सगळी शोध मोहीम अनिल देशमुख यांच्याशी संबंधित आहे. पुरावे गोळा करण्यासाठी सीबीआयची टीम याठिकाणी आली होती. विशाल खटवाणी असं या सीएचं नाव समोर आलंय. त्यांच्याकडं चौकशी करण्यात आली. काही डिजीटल पुरावे तसेच कागदपत्र तपासल्याची माहिती आहे. एकंदरित काही महत्त्वाचे पुरावे सीबीआयच्या हाती लागल्याची शक्यता आहे.