City survey | नागपूर जिल्ह्यात 8 हजार 860 गावांच्या सिटी सर्व्हेची मोहीम, नकाशा डिजिटलायझेनचे काम पूर्ण

सॅटेलाईट व रोव्हर यंत्राच्या सहाय्याने भूमापन होत असल्याने अक्षांश व रेखांश नोंदी अचूक मिळून सुरळीत दस्ताऐवज निर्माण होईल. विभागाद्वारे सर्व नकाशांचे डिजिटलायझेनचे काम पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती भूमी अभिलेख उपसंचालक विष्णू शिंदे (Deputy Director of Land Records Vishnu Shinde) यांनी दिली.

City survey | नागपूर जिल्ह्यात 8 हजार 860 गावांच्या सिटी सर्व्हेची मोहीम, नकाशा डिजिटलायझेनचे काम पूर्ण
कार्यक्रमात उपस्थित नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 5:54 AM

नागपूर : लोकांशी निगडीत मालकी हक्क नमूद करणारे अभिलेखे ठेवणारा भूमी अभिलेख हा अत्यंत महत्वाचा विभाग आहे. राजेशाही व ब्रिटीशांच्या कालखंडात तसेच स्वातंत्र्योत्तर काळापासून भूमापनाचे व अभिलेख जतन करण्याचे काम या विभागाकडून केल्या जाते. महसूल गोळा करुन राज्याच्या विकासकामांना गती देण्याचे काम विभागाव्दारे होत असल्याने या विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना राज्यस्तरावर विशेष बैठकीच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (Guardian Minister Dr. Nitin Raut) यांनी काल येथे दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवनात विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेद्वारे आयोजित 53 व्या केंद्रीय वार्षिक आमसभा व भूमापन दिनाचे उद्घाटन डॉ. राऊत यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. राज्यात भूमी अभिलेख विभागाद्वारे (Land Records Department) 40 हजार गावांचा ड्रोन सर्व्हे केला जात आहे. नागपूर जिल्ह्यात 8 हजार 860 गावांच्या सिटी सर्व्हेची मोहीम राबविण्यात येत आहे. त्याद्वारे लोकांना मिळकत पत्रिका व उतारा उपलब्ध होईल. सॅटेलाईट व रोव्हर यंत्राच्या सहाय्याने भूमापन होत असल्याने अक्षांश व रेखांश नोंदी अचूक मिळून सुरळीत दस्ताऐवज निर्माण होईल. विभागाद्वारे सर्व नकाशांचे डिजिटलायझेनचे काम पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती भूमी अभिलेख उपसंचालक विष्णू शिंदे (Deputy Director of Land Records Vishnu Shinde) यांनी दिली.

भूमापनाचे काम प्रगतीपथावर

जिल्हाधिकारी आर. विमला, भूमी अभिलेख उपसंचालक विष्णू शिंदे, जिल्हा अधीक्षक (भूमी अभिलेख) श्री. दाबेराव, संघटनेचे अध्यक्ष दिलीप गर्जे, सरचिटणीस श्रीराम खिरेकर, कार्याध्यक्ष प्रदीप मिश्रा, मनीष कुळकर्णी, राजेश होले, प्रकाश विनकणे आदी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी 10 एप्रिल या भूमापन दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. कुठल्याही प्रकल्पाची निर्मिती होताना सर्वप्रथम भूमी अभिलेख विभागाकडून भूमापनाच्या माध्यमातून त्याचा शुभारंभ होत असतो. राज्यातील पुल, रस्ते, धरणे, कालवे, इमारती आदी महत्वपूर्ण निर्माणाधीन प्रकल्पांचे तसेच गावांचे, शेतकऱ्यांच्या शेतजमीन, वनजमीन आदींच्या क्षेत्रफळाच्या अचूक नोंदी व नकाशे तयार करण्याचे काम या विभागाद्वारे केल्या जाते. लोकांच्या मालमत्तेचे मालकी हक्क दर्शविणाऱ्या दस्ताऐवजांच्या नोंदी व जतन विभागाकडून केल्या जाते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोजणीचे व भूमापनाचे काम सोपे झाले आहे. नागपूर जिल्ह्यात मालकी हक्क दस्ताऐवज, मिळकत पत्रिकांचे स्कॅनिंग व डिजिटलायझेनचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे, ही कौतुकाची बाब आहे, असेही ते म्हणाले. राज्य शासनाच्या ड्रोन सर्व्हे मोहीम तसेच अत्याधुनिक रोव्हर यंत्राच्या सहाय्याने भूमापनाचे काम प्रगतीपथावर आहे. यामुळे अचूक मोजणीचे काम होत आहे.

कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदतीचे प्रस्ताव

भूमी अभिलेख विभागास तांत्रिक दर्जा व कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतनश्रेणी लागू करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येईल. विभागातील गट ड ते गट अ पर्यंतच्या पदांच्या पदोन्नती तसेच रिक्त पदांच्या भरती संदर्भातील प्रश्न सोडविण्यात येईल. कोविडमुळे निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदतीच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येईल, असेही डॉ. राऊत यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी श्रीमती विमला म्हणाल्या, जमिनीचा मालकी हक्क नमूद करणारा हा विभाग महत्वाचा विभाग आहे. जमिनीचा खरा मालक हा भूमालक आहे. त्याचे दस्ताऐवज जतन करणारा विभाग हा रक्षक म्हणून काम करतो. लोकांमध्ये प्रशासनाची प्रतिमा उंचाविण्यासाठी विभागाने जनतेची कामे जबाबदारीपूर्वक करुन सामाजिक बांधिलकी जोपासावी. महसूल व भूमी अधिलेख विभागाने समन्वयातून लोकहितकारी कामे पूर्णत्वास न्यावीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Video Sharad Pawar | शरद पवार यांचे नागपुरात जल्लोषात स्वागत, विमानतळावर कार्यकर्त्यांची गर्दी, अमरावतीच्या दिशेने रवाना

Nagpur Vaccination | नागपूर मनपा क्षेत्रात लसीकरण, 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Buldana Jobs | रोजगार निर्मितीत बुलडाणा जिल्हा विदर्भात अव्वल, 10 लाख रोजगाराच्या संधी केल्या उपलब्ध

मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.