मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 5 सर्वात मोठ्या घोषणा; बुलढाण्यात सर्वात मोठं विधान

मराठा समाज फार संयमी आहे. शांततेत चाललेल्या आंदोलनात दगडफेक कुणी केली ? सामाजिक सलोखा कोण बिघडवत आहे ? राजकीय पोळू भाजू नका, असा इशार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. ते बुलढाण्यातील सभेत बोलत होते.

मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 5 सर्वात मोठ्या घोषणा; बुलढाण्यात सर्वात मोठं विधान
cm eknath shinde Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 03, 2023 | 3:02 PM

चैतन्य मनिषा अशोक, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बुलढाणा | 3 सप्टेंबर 2023 : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे आज तिसऱ्या दिवशीही राज्यात पडसाद उमटले आहेत. या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. तर राज्यभरात मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे राज्यात तणावाची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज 5 महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मराठा आरक्षण आणि आंदोलनाशी संबंधित या घोषणा आहेत. तसेच कुणीही विरोधकांच्या नादी लागू नका. विरोधक राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी बुलढाण्यात आले होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं. मी तीन दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांना फोन केला होता. तू उपोषण करून को. तुझी तब्येत ठिक नाही. आपण चर्चा करू, असं मी त्यांना सांगितलं होतं. पण तरीही त्यांनी उपोषण केलं, असं सांगतानाच आंदोलकांवर लाठीमार झाल्याचं आम्ही समर्थन करत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मोठ्या घोषणा काय?

यावेळी मुख्यमंत्र्यांनी 5 महत्त्वाच्या घोषणा केल्या. आंदोलकांवर लाठीमार केल्या प्रकरणी जालन्यातील पोलीस अधीक्षकाला आम्ही सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे, डीवायएसपीलाहा जिल्ह्यातून बाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) सक्सेना हे उद्याच जालना येथे येतील आणि दोषींना निलंबित केले जाईल, मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेची वेळ पडल्यास न्यायालयीन चौकशीही केली जाईल, आदी मोठ्या घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या.

हे सुद्धा वाचा

तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असंही ते म्हणाले.

चव्हाण तुम्ही काय केले?

जालन्यात दुर्दैवी घटना झाली. त्याचे मलाही दुःख झाले आहे. सर्वांनाच त्याचे दु:ख आहे. काही लोकं तिथे येऊन गेले. त्यांना लोकांनी त्यांची जागा दाखवली. ज्या लोकांनी मराठा आरक्षणाचे गळे घोटले, ते लोकं तिथे गळा काढायला गेले होते, अशी टीका करतानाच महाविकास आघाडीच्या काळात सुप्रीम कोर्टात हे आरक्षण गेले. अशोक चव्हाण तुम्ही उपसमितीचे अध्यक्ष होते, तुम्ही काय केले?, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

माजी मुख्यमंत्री काय म्हणाले?

मराठा समाजाचे मूक मोर्चे निघत होते. शांततेत मोर्चे निघत होते. शिस्तबद्ध मोर्चे निघत होते. लाखोंचे हे मोर्चे होते. यावेळी माजी मुख्यमंत्र्यांनी या मोर्चाला ‘मुका मोर्चा’ म्हणून संबोधले होते, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली.

मी काय घोडं मारलंय?

जेव्हापासून मी मुख्यमंत्री झालो, तेव्हापासून आज सरकार जाणार, उद्या जाणार असं चालू झाले आहे. आता सगळे ज्योतिषी बंद झाले. सरकार पडता पडता, अजितदादा आमच्यासोबत आले. आता म्हणतात, मुख्यमंत्री बदलणार. मी काय तुमचं घोडं मारलंय? जनता माझ्याबरोबर आहे, तोपर्यंत कोणीही माझा बाल बाका करू शकत नाही, असंही ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....
'..त्यांच्या पाय चाटण्याला आक्षेप', देवेंद्र फडणवीस ठाकरेंवर भडकले अन्
'..त्यांच्या पाय चाटण्याला आक्षेप', देवेंद्र फडणवीस ठाकरेंवर भडकले अन्.
प्रचाररॅलीत कार्यकर्त्यांनी उडवले फटाके अन् ठिणगीन उमेदवाराचे केस जळले
प्रचाररॅलीत कार्यकर्त्यांनी उडवले फटाके अन् ठिणगीन उमेदवाराचे केस जळले.
चित्रा वाघ यांचं ट्वीट खरं की खोटं? नितीन राऊतांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर
चित्रा वाघ यांचं ट्वीट खरं की खोटं? नितीन राऊतांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर.
मनसेनं 'खुर्ची' टाकली, संजय राऊत 'खाट' टाकणार, राज ठाकरेंवर निशाणा
मनसेनं 'खुर्ची' टाकली, संजय राऊत 'खाट' टाकणार, राज ठाकरेंवर निशाणा.
पवारांच्या पत्नीला कंपनीत रोखलं, अर्धा तास खोळंबा अन्... काय घडलं?
पवारांच्या पत्नीला कंपनीत रोखलं, अर्धा तास खोळंबा अन्... काय घडलं?.
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....