चौथ्या झाडीपट्टी नाट्य संमेलनात विविधरंगी प्रयोग!, लवकरच होणार थाटात उद्घाटन, कोणकोणत्या कार्यक्रमांची मेजवानी

सुप्रसिद्ध गायक व अभिनेते अनिरुद्ध वनकर संमेलनाचे अध्यक्ष, तर माजीमंत्री व ब्रह्मपुरी विधानसभेचे आमदार विजय वडेट्टीवार स्वागताध्यक्ष असणार आहेत. सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद भोसले यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

चौथ्या झाडीपट्टी नाट्य संमेलनात विविधरंगी प्रयोग!, लवकरच होणार थाटात उद्घाटन, कोणकोणत्या कार्यक्रमांची मेजवानी
Follow us
| Updated on: Sep 14, 2022 | 3:18 PM

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी (Bramhapuri) येथे पंचशील एज्युकेशन सोसायटीच्या विस्तीर्ण प्रांगणात 17 व 18 सप्टेंबर रोजी दोन दिवस चालणाऱ्या चौथ्या झाडीपट्टी नाट्य संमेलनाची कार्यक्रम (Program) पत्रिका जाहीर झाली. नाट्य संमेलनाच्या निमित्ताने रसिकांना विविधरंगी कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे. 17 सप्टेंबरला सकाळी 9 वाजता शिवाजी चौकातून नाट्यदिंडीने संमेलनाची सुरुवात होणार आहे. पारंपरिक वेशभूषेतील कलावंत, लेझीम पथक, आदिवासी नृत्य, दंडार, गोंधळ, झाडीपट्टीतील (Zadhipatti) सर्व कलावंत व शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग हे यंदाच्या संमेलनाचे वैशिष्ट्य ठरणार आहेत. शिवाय संमेलनादरम्यान झाडीपट्टीच्या उत्कृष्ट कलावंताचा सन्मान व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजनही करण्यात आले आहेत.

अभिनेत्री दीपाली सय्यद उपस्थित राहणार

सुप्रसिद्ध गायक व अभिनेते अनिरुद्ध वनकर संमेलनाचे अध्यक्ष, तर माजीमंत्री व ब्रह्मपुरी विधानसभेचे आमदार विजय वडेट्टीवार स्वागताध्यक्ष असणार आहेत. सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद भोसले यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. संमेलनाच्या पहिल्या दिवशी 17 सप्टेंबरला सकाळी 9 वाजता नाट्य दिंडीने संमेलनाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता उद्घाटन समारंभ होणार आहे. उद्घाटन सोहळ्यातच झाडीपट्टी स्मरणिका प्रकाशन व स्मशान पेटलं आहे.

घायाळ पाखरा नाटकाचे लोकार्पण होईल. दुपारी 2. 30 वाजता गोंधळ , आदिवासी नृत्य आणि दुपारी 3.30 वाजता ‘झाडीपट्टी नाटक व उद्याची स्वप्न’ आणि ‘झाडीपट्टी नाटक व शासनाची उदासीनता’ या विषयावर परिसंवाद होईल. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता युवराज प्रधान दिग्दर्शित ‘संतान’ नाटक, सायंकाळी 7.30 वाजता डॉ. शेखर डोंगरे दिग्दर्शित ‘फाटका संसार’ व रात्री 8.30 वाजता देवेंद्र दोडके दिग्दर्शित ‘ प्रतिशोध कुंकवाचा’ नाटकाचा प्रयोग सादर होईल.

हे सुद्धा वाचा

18 सप्टेंबरचे कार्यक्रम काय?

संमेलनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 18 सप्टेंबर रोजी सकाळी 9 .30 वाजता तालवाद्य, झाडीपट्टी गौरव गीते, लोकगीते सादर होणार आहे. सकाळी 11 वाजता ‘झाडीपट्टी नाट्य चळवळ आणि त्यापुढील आव्हाने’ या विषयावर परिसंवाद होईल. दुपारी 2 वाजता झाडी अप्सरांच्या लावण्या सादर होतील. दुपारी 3 वाजता ‘ झाडीपट्टीतील महिला कलाकारांचे सक्षमीकरण’ या विषयावर परिसंवाद होईल.

सायंकाळी 4.30 वाजता झाडीपट्टी कलाकारांची गाणी व सायंकाळी 5 वाजता संमेलनाध्यक्ष यांची प्रा. डॉ. ईसादास भडके मुलाखत घेतील. सायंकाळी 5.30 वाजता समारोपीय, सत्कार सोहळा व ठराव वाचन कार्यक्रम पार पडेल. तसेच समारोपानंतरही रात्री 8.30 वाजता अनिरुद्ध वनकर लिखित, दिग्दर्शित “मरते रे मैना झुरते रे राघू” या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होईल. संमेलनादरम्यान सादर होणाऱ्या कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.