Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दैनंदिन वापर ते आधुनिक शेतीची संकल्पना; सौरऊर्जेवर चालणारे फवारणी करणारे रोबोट

वेळेचे नियोजन करता यावे म्हणून सूचना देणारा अलार्म देखील विद्यार्थ्यांनी विकसित केल्याचे प्रदर्शनीत दिसून आले. सोबतच आधुनिक शेतीच्या दृष्टीने सौरऊर्जेवर चालणारे फवारणी करणारे रोबोट यासह विविध मॉडल या प्रदर्शनीत दिसून आले.

दैनंदिन वापर ते आधुनिक शेतीची संकल्पना; सौरऊर्जेवर चालणारे फवारणी करणारे रोबोट
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 4:26 PM

नागपूर : रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्माण अथवा उत्पादित झालेल्या अन्नाचे सेवन केल्याने मानवी शरीरावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे जनुकीय बदल देखील झपाट्याने होत आहे. शरीरावर होणारे परिणाम शोधता यावेत म्हणून जनुकीय घटकांचे सूक्ष्म संशोधन करणारे मॉडेल या प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी प्रदर्शित केले. सोबतच रेल्वे अपघात होऊ नये म्हणून सुरक्षा प्रणाली बाबत मॉडेल सादर करण्यात आले. वेळेचे नियोजन करता यावे म्हणून सूचना देणारा अलार्म देखील विद्यार्थ्यांनी विकसित केल्याचे प्रदर्शनीत दिसून आले. सोबतच आधुनिक शेतीच्या दृष्टीने सौरऊर्जेवर चालणारे फवारणी करणारे रोबोट यासह विविध मॉडल या प्रदर्शनीत दिसून आले.

वैज्ञानिक मॉडेल्स

जैवतंत्रज्ञान, दैनंदिन वापरासह आधुनिक शेतीची संकल्पना साकार करणारे विविध समाजपयोगी वैज्ञानिक मॉडेल्स विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनीत प्रस्तुत केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने विज्ञान सप्ताह साजरा केला जात आहे. या सप्ताहाच्या अंतिम दिवशी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रतिकृतींचे प्रदर्शन गणित विभागात शुक्रवारी आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनीमध्ये विद्यापीठाच्या विभागासह शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

सोलर बेस्ड स्प्रेईंग रोबोट

दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी येथील विद्यार्थी सर्वेश रंभाळ व तेजस खराटे यांनी मल्टीपर्पज ट्रेडमिल हे मॉडेल सादर केले. विद्यापीठाच्या बायोकेमिस्ट्री विभागातील दिबा खान व रुबल रामटेके यांनी मॉलिक्युलर डॉकिंग टूल इन ड्रग डिस्कवरी, पीजीटी डिपार्टमेंट ऑफ बायोकेमिस्ट्रीमधील मोनाली जरीया व सुष्मिता पटेल यांनी रोल ऑफ प्रायमर इन पीसीआर ॲन्ड प्रायमर डिझाईन हे मॉडेल सादर केले. विद्यापीठाच्या पीजीडीआयआर विभागातील निखिल भोमले व चंद्रकांत क्षीरसागर यांनी सोलर बेस्ड स्प्रेईंग रोबोट, मनोहरभाई पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथील कुणाल चौधरी याने अप्लिकेशन ऑफ सायन्स यावर पेपर प्रेझेंटेशन केले.

हे प्रयोगही विद्यार्थ्यांनी केले सादर

शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील प्रियांशु अत्री व ऋग्वेद जोशी यांनी हायड्रो इलेक्ट्रिक डॅम, तानिया पालीवाल हिने प्लेट टेक्टोनिक्स, सायली धर्मेशराव हिने डायलिसिस मशीन, भूमिका मिराशी हिने डीएनए एक्स्ट्रक्शन फ्रॉम फ्रुट, मिताली ठाकरे व अर्पित कांबे यांनी अँटी स्लिप अलार्म प्रोजेक्ट मॉडल्सचे सादरीकरण केले. जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधील शिवम रोहनकर यांनी रिसायकल क्लास सँड तर नित्या दिवेदी हिने कन्व्हर्शन ऑफ ग्लास वेस्ट इन टू सँड हे मॉडेल सादर केले. राजीव गांधी बायोटेक्नॉलॉजी सेंटर येथील खुशबू भयानी व ऐश्वर्या गौड यांनी आर-डीएनए टेक्नॉलॉजी बाबत मॉडेल सादर केले. डिपार्टमेंट ऑफ फार्मासिटिकल सायन्समधील सुरज कवसे व दर्शन वाघमारे यांनी ड्रग डिलिव्हरी सिस्टम फॉर चिल्ड्रेन पीजीटीडीमधील वैभव भगत यांनी ड्वेल पर्पज कॉन्सन्ट्रेटर सिस्टीम, रोशनी कटरे व जितेश लिखार यांनी लाईफ सायन्स डिटेक्टर प्रोजेक्ट सादर केला. एलआयटी येथील रोहन सोलव धनाच्या शिलक्यापासून मिळत असलेल्या सिलिकेबाबत संशोधन सादर केले.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.