NMC Election | नागपुरात काँग्रेसचा डिजिटल मतदार सदस्य नोंदणीवर भर; भाजपचा बैठकांवर जोर का?

काँग्रेसला महापालिकेत परत सत्ता हस्तगत करायची आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कामाला लागले आहेत. सक्षम उमेदवार शोधा, असं त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलंय. पण, तिकीट वाटप झाल्याशिवाय कोणाची काही खरे नसते.

NMC Election | नागपुरात काँग्रेसचा डिजिटल मतदार सदस्य नोंदणीवर भर; भाजपचा बैठकांवर जोर का?
नागपूर महापालिका
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 7:51 AM

नागपूर : मनपाची निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने तसेच शिवसेनेनेही केली आहे. त्यामुळं काँग्रेसमधून किंवा भाजपमधून कोणी बंडखोरी करतात का, यावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांची भिस्त राहणार आहे. उमेदवारी कोणाला मिळणार, कोण बंडखोरी करू शकतो, यावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांची नजर राहणार आहे. भारतीय जनता पक्षाचा जोर प्रभागानुसार बैठकांवर दिसून येतो. तर काँग्रेस मतदारांच्या डिजीटल नोंदणीवर (Digital Registration) फोकस करत आहे. महापालिकेतील संपूर्ण जागा लढवायला शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सक्षम असल्याचं दिसून येत नाही. म्हणून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नागपूर मनपाकडं आतापासूनच लक्ष केंद्रित केलंय. काँग्रेसची हाजीहाजी करण्यात काही अर्थ नाही. स्वबळावर निवडणूक कशी लढता येईल, याची तयारी करा, असे निर्देशच प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी बैठकीत कार्यकर्त्यांना दिलेत. त्यांचा थेट रोख हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडं होता.

भाजपकडं उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या भारी

महापालिकेत सध्या भाजप सत्तेत आहे. त्यामुळं उमेदवारीची मागणी भाजपकडे जास्त प्रमाणात केली जाईल. ही बाब लक्षात घेता भाजपने बुथ बैठकांवर भर दिला आहे. शहर, मंडल, प्रभाग अशा स्तरावरही बैठका घेतल्या जात आहेत. उभेच्छुकांना या बैठकांना हजर राहावे लागत आहे. वारंवार होणाऱ्या बैठकांमुळं कार्यकर्ते त्रस्त झाले आहेत. एकवेळ उमेदवारी मिळाली नाही, तर चालले. पण बैठकांचे हे सत्र संपवा, असाच कल कार्यकर्त्यांचा दिसून येत आहे.

आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे मनोमीलन कसे होणार

शिवसेनेत गेल्या काही दिवसांत बदल झाले. संघटनेत बाहेरून आलेले लोकं आले. त्यामुळं जुने नाराज झाले. संघटन कसं मजबूत करायचं असा प्रश्न आहे. जुन्यांना सांभाळून घेण्याची कसरत नव्या लोकांना करावी लागत आहे. आजी-माजींचे मनोमीलन कसे होते, यावर शिवसेनेचे भविष्य अवलंबून आहे.

ठाकरे-राऊत यांना चालणारा हवा उमेदवार

काँग्रेसला महापालिकेत परत सत्ता हस्तगत करायची आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कामाला लागले आहेत. सक्षम उमेदवार शोधा, असं त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलंय. पण, तिकीट वाटप झाल्याशिवाय कोणाची काही खरे नसते. आमदार विकास ठाकरे आणि पालकमंत्री नितीन राऊत या दोघांनाही चालणारा उमेदवार हवा. तरच त्या उमेदवारावर शिक्कामोर्तब होईल.

Russell’s Viper : शेपटीच्या सहाय्यानं कसा भिंतीवर चढाई करतोय घोणस! ओळखा आणि सावध व्हा

Budget 2022 : अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांना काय मिळणार? खाद्यतेलाच्या आत्मनिर्भरतेचं धोरण राहण्याची शक्यता

भाजप आमदाराच्या मुलाचा कार अपघातात मृत्यू, विजय रहांगदळेंच्या मुलाचा वर्ध्यातील कार अपघातात दुर्दैवी अंत

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.