है तय्यार हम… काँग्रेसची महारॅली, 40 एकरावर तीन स्टेज, सोनिया गांधींसह काँग्रेसच्या दिग्गज नेते उद्या नागपुरात

या सभेच्या निमित्ताने काँग्रेसने है तय्यार हम... असा नवा नारा दिला आहे. “है तय्यार हम, महिला अपराध के खिलाफ” अशा घोषणा लिहिलेले बॅनर्स आणि होर्डिंग्ज नागपूरमध्ये झळकले आहेत. त्यामुळे नागपूरमधील वातावरण काँग्रेसमय झालं आहे. है तय्यार हमचा ई रिक्षाच्या माध्यमातूनही प्रचार केला आजात आहे.

है तय्यार हम... काँग्रेसची महारॅली, 40 एकरावर तीन स्टेज, सोनिया गांधींसह काँग्रेसच्या दिग्गज नेते उद्या नागपुरात
CongressImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 27, 2023 | 5:55 PM

गजानन उमाटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 27 डिसेंबर 2023 : काँग्रेसच्या 138व्या स्थापना दिनानिमित्ताने उद्या नागपुरात महारॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. 40 एकर जागेवर ही महारॅली होणार आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण नागपूर आणि विदर्भ नगरी सजली आहे. जागोजागी पोस्टर्स, बॅनर्स आणि होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. या महारॅलीला प्रचंड गर्दी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या महारॅलीच्या माध्यमातून काँग्रेस मोठं शक्तीप्रदर्शन करणार आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या रॅलीसाठी नागपुरात येणार आहेत. त्यामुळे या रॅलीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

नागपुरात उद्या होणाऱ्या या महारॅलीच्या सभा स्थळाला ‘भारत जोडो मैदान’ असे नाव देण्यात आलं आहे. 40 एकर मैदानावर ही सभा होत आहे. सभेच्या ठिकाणी तीन भव्य स्टेज उभारण्यात आले आहेत. या स्टेजवर देशभरातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते, आमदार, खासदार, प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री बसणार आहेत. सभेसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी नागपूरात येणार आहेत.

आढावा घेतला

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिघोरी मैदानावर जाऊन सभेचा आढावा घेतला. तसेच संबंधितांना काही सूचनाही केल्या आहेत. ही सभा जंगी करण्यासाठी काँग्रेस नेते प्रयत्न करत आहेत. या सभेच्या माध्यमातून काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीचं बिगुल फुंकलं जाणार आहे. त्यामुळे काँग्रेस नेते उद्याच्या रॅलीत काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

है तय्यार हम

या सभेच्या निमित्ताने काँग्रेसने है तय्यार हम… असा नवा नारा दिला आहे. “है तय्यार हम, महिला अपराध के खिलाफ” अशा घोषणा लिहिलेले बॅनर्स आणि होर्डिंग्ज नागपूरमध्ये झळकले आहेत. त्यामुळे नागपूरमधील वातावरण काँग्रेसमय झालं आहे. है तय्यार हमचा ई रिक्षाच्या माध्यमातूनही प्रचार केला आजात आहे. विशेष, म्हणजे घोटाळ्याप्रकरणी शिक्षा झालेले आणि आमदारकी गमवावी लागलेले काँग्रेस नेते सुरेश केदार यांचे फोटोही काँग्रेसच्या बॅनर्सवर झळकले आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.