Coronavirus: ‘महाराष्ट्रातील परिस्थिती हाताबाहेर; पंतप्रधान मोदींनी राज्यात आणीबाणी लावावी’

संविधानाच्या कलम 360 अन्वये महाराष्ट्रात दोन महिन्यांची आणीबाणी लावण्यात लागू करावी. | declare emergency in Maharashtra

Coronavirus: 'महाराष्ट्रातील परिस्थिती हाताबाहेर; पंतप्रधान मोदींनी राज्यात आणीबाणी लावावी'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Apr 21, 2021 | 10:07 AM

नागपूर: कोरोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात आर्थिक व आरोग्य आणीबाणी लागू करावी, अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. (Congress leader Ashish Deshmukh demands health and financial emergency in Maharashtra)

आशिष देशमुख यांच्या या घरच्या आहेरामुळे आता विरोधकांकडून ठाकरे सरकारची अधिकच कोंडी केली जाण्याची शक्यता आहे. आशिष देशमुख यांनी आपल्या पत्रात राज्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यात राज्य सरकारचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे म्हटले आहे. राज्यात कोरोनामुळे 60 हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संविधानाच्या कलम 360 अन्वये महाराष्ट्रात दोन महिन्यांची आणीबाणी लावण्यात लागू करावी. अशीच परिस्थिती राहिली तर लोक रस्त्यावर उतरतील, अशी भीतीही आशिष देशमुख यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. त्यामुळे आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या सगळ्या वादावर कशाप्रकारे पडदा टाकणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

महाराष्ट्रात पुनश्च: कडकडीत लॉकडाऊन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच घोषणा करणार?

राज्यात कोरोनाचा हाहा:कार पाहायला मिळत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने राज्यातील लॉकडाऊनचे नियम आणखी कठोर केले जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात आज कडकडीत लॉकडाऊनची घोषणा करतील, अशी चर्चा आहे.

?काय सुरु राहणार?? ?सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी आणि मिठाई दुकाने, सर्व खाद्यपदार्थांचे दुकान (चिकन, मटण, कोंबडी, मासे, अंडी सह) त्याचप्रमाणे कृषी अवजारे आणि कृषी उत्पादने, पाळीव प्राण्यांचे खाद्याची दुकाने, पावसाच्या हंगामासाठी साहित्य (वैयक्तिक आणि संघटनात्मक) सकाळी सात वाजेपासून अकरा वाजेपर्यंत उघडे राहतील. ? वरील नमूद दुकानांमधून घरपोच सेवा देण्यासाठी सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 8 पर्यंत मुभा असेल, परंतु आवश्यक वाटल्यास स्थानिक प्रशासन या वेळांमध्ये फेरबदल करू शकते. ?स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाला वाटल्यास कलम दोन अंतर्गत काही गोष्टींना आणि सेवांना, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची संमती घेऊन आवश्यक सेवा म्हणून घोषित करू शकते. ?या आदेशामध्ये नमूद केलेल्या गोष्टीं व्यतिरिक्त इतर सर्व अटी व नियम 13 एप्रिल 2021 रोजी राज्य शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या पत्रकानुसारच असतील. संबंधित बातम्या : 

PM Narendra Modi Live | लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून वापरावा- मोदी

Maharashtra vaccination plan : महाराष्ट्राचा अॅक्शन प्लॅन ठरला, परदेशातून लसी मागवणार, 10 कोटींचं टार्गेट

Maharashtra Corona Update : चिंता कायम; राज्यात दिवसभरात 519 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, तर 62 हजार 97 नवे रुग्ण

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.