‘भाजपचा खासदार चोरुन भेटला’, भर सभेत राहुल गांधींचा मोठा गौप्यस्फोट

राहुल गांधी यांनी नागपूर येथे भाषण करत असताना एक मोठा दावा केला. त्यांना संसदेत भाजपचा एक खासदार चोरुन भेटला. यावेळी त्याने राहुल गांधी यांना आपल्या मनाची झालेली दुरावस्थान सांगितली. हा खासदार आधी काँग्रेसमध्ये होता. पण सध्या तो भाजपात आहे, असं राहुल गांधींनी सांगितलं.

'भाजपचा खासदार चोरुन भेटला', भर सभेत राहुल गांधींचा मोठा गौप्यस्फोट
Follow us
| Updated on: Dec 28, 2023 | 5:54 PM

नागपूर | 28 डिसेंबर 2023 : काँग्रेसचे आज नागपुरात 139 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने भव्यदिव्य सभा पार पडली. महाराष्ट्राचे सर्व काँग्रेसचे दिग्गज नेते या सभेत सहभागी झाले. तसेच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीदेखील या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी राहुल गांधी यांनी भर सभेत मोठा गौप्यस्फोट केला. काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या एक खासदार आपल्याला संसदेत चोरुन भेटला. त्यावेळी त्याने आपल्या मनाची झालेल्या अनावस्थाविषयी भावना व्यक्त केली, असं राहुल गांधी यांनी सांगितलं. काँग्रेसमध्ये लोकप्रतिनिधींना मोकळेपणा आणि स्वातंत्र्य आहे, पण भाजपात तसं नाही. तिथे वरिष्ठांचा जो आदेश येतो त्याचं पालन करावं लागतं, असं राहुल गांधी यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी चोरुन संसदेत भेटलेल्या खासदारासोबत झालेल्या संभाषणाचं उदाहरण दिलं.

“काही दिवसांपूर्वी भाजपचा एका खासदार मला लोकसभेत भेटला, अनेक भाजप खासदार आधी काँग्रेस पक्षात होते तसा हा देखील काँग्रेस पक्षात होता. मला चोरुन भेटला. मला लांबून पाहिलं, लपून, भीतीने म्हणतो, राहुलजी आपल्यासोबत बातचित करायची आहे. मी म्हटलं, काय बोलायचं आहे, तुम्ही तर भाजपात आहात? त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर थोडं टेन्शन दिसत होतं. मी विचारलं, सर्व ठीक आहे ना? तर म्हणाला, नाही. काय झालं? तर तो म्हणाला, राहुलजी भाजपमध्ये राहून सहन होत नाही. मी भाजपात आहे, पण माझं मन काँग्रेसमध्ये आहे. मी म्हटलं की, तुझं मन काँग्रेसमध्ये आणि शरीर भाजपात आहे. याचा अर्थ मन शरीराला काँग्रेसमध्ये आणण्यासाठी घाबरत आहे”, असं राहुल गांधी भाषणात म्हणाले.

‘…आणि नाना पटोले आऊट झाले’

“मी म्हटलं, मन का नाही मानत आहे? तुम्ही खासदार आहात. तुम्ही मला हिंट देत आहात. मग मन का नाही मानत आहे? म्हणतो, राहुलजी भाजपात गुलामी चालते, जे वरिष्ठांकडून सांगितलं जातं ते न विचार करता करावं लागतं. आमचं कुणी ऐकत नाही. वरुन ऑर्डर येते, जसं आधी राजा आदेश द्यायचे, तसं वरिष्ठांकडून आदेश येतात आणि त्याचं पालन करावं लागतं. आपल्याला त्याचं पालन केल्याशिवाय पर्याय नसतो. आमचे नाना पटोले प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदींना शेतकऱ्यांबद्दल एक प्रश्न विचारला होता, जीएसटी तुम्ही जो लावला त्यामध्ये शेतकऱ्यांचा काय वाटा असेल? मोदीजींना प्रश्न आवडला नाही. पटोले आऊट झाले. त्यांची विचारधारा राजेशाहीची विचारधारा आहे. कुणाचं ऐकायचं नाही. आदेश वरिष्ठांकडून येणार आणि आपल्याला त्याचं पालन करावं लागेल”, असा दावा राहुल गांधींनी केला.

‘काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विचारांचा आदर करतो’

“काँग्रेस पक्षात आवाज खालून येतो, ग्राऊंड पातळीतून, आमचा लहानातील लहान कार्यकर्ता आमच्या कोणत्याही नेत्याला टोकू शकतो. आमचा कार्यकर्ता माझ्या समोर येतात आणि मला म्हणतात राहुलजी, हे तु्म्ही जे केलं ते चांगलं नाही केलं. तेव्ही मी त्यांना सांगतो की, मी यासाठी हे केलं. मी त्यांचं ऐकतो. त्यांच्या आवाजाचा आदर करतो. मी हेही सांगतो की, मी तुमच्या मताशी सहमत नाही. पण त्याचा आवाज ऐकतो”, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.