भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी बैठक?,आशिष देशमुखांवर कारवाईचे संकेत; काँग्रेसची चौकशी समिती नागपुरात

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अच्छे दिन आणणाऱ्या नागपूर जिल्हा काँग्रेसमधील वाद थांबत नसल्याचं चित्र आहे. जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केल्यामुळे काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्यावर पक्षांतर्गत कारवाईचे संकेत मिळाले आहेत.

भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी बैठक?,आशिष देशमुखांवर कारवाईचे संकेत; काँग्रेसची चौकशी समिती नागपुरात
आशिष देशमुख
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 12:05 PM

नागपूर: विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अच्छे दिन आणणाऱ्या नागपूर जिल्हा काँग्रेसमधील वाद थांबत नसल्याचं चित्र आहे. जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केल्यामुळे काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्यावर पक्षांतर्गत कारवाईचे संकेत मिळाले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चंद्रकांत हांडोरे समिती नागपुरात दाखल झालीय. तर, आशिष देशमुख हायकमांडला भेटायला दिल्लीत गेले असल्याची माहिती आहे. आज काँग्रेसच्या स्थानिक वरीष्ठ नेत्यांशी संवाद साधणार असून, लवकरच अहवाल पक्षाध्यक्षांकडे सादर करणार, अशी माहिती चंद्रकांत हांडोरे यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ला दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?

काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी भाजप उमेदवाराचा प्रचारार्थ बैठक घेतल्याची माहिती आहे. 25 सप्टेंबर रोजी 2021 सावरगाव जि. प. च्या भाजपा उमेदवार पार्वतीताई काळबांडे यांचे प्रचारार्थ सावरगाव येथील त्यांचे निवासस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव व माजी आमदार आशिष देशमुख यांनी बैठक घेतली होती. यावेळी भाजपचे उकेश चव्हाण यांचेसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आशिष देशमुख यांची सुनिल केदारांविरोधात भूमिका

मंत्री सुनील केदार 2002 मध्ये नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना त्यांनी बँकेचे 150 कोटी रुपये खासगी दलालांमार्फत रोख्यांमध्ये गुंतवून बँकेचे दीडशे कोटी रुपयांचे नुकसान केल्याचे आरोप सुनील केदार यांच्यावर आहेत. याप्रकरणी केदार व इतर 10 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र राज्याच्या सहकार खात्याने कोर्टात खटला दाखल केला आहे. हा खटला गेली 19 वर्षे कोर्टात सुरु आहे. आता याप्रकरणी सरकारी वकील म्हणून असिफ कुरेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.असिफ कुरेशी हे काँग्रेसच्या लीगल सेलचे अध्यक्ष आहेत.. त्यामुळे ते या खटल्यात योग्य बाजू मांडू शकत नसल्याचा आरोप करीत एडव्होकेट असिफ कुरेशी यांची नेमणूक रद्द करावी अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली होती. सोबतच मंत्री सुनील केदार यांनाही मंत्रिमंडळातून बरखास्त करावे, अशी मागणी करणारे पत्र आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते.

कोण आहेत आशिष देशमुख?

आशिष देशमुख हे 2014 मध्ये नागपुरातील काटोल विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर आमदार होते. राष्ट्रवादीचे उमेदवार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पराभूत करत त्यांनी विजय मिळवला होता. अनिल देशमुख हे आशिष देशमुखांचे काका असून काका-पुतण्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे. आशिष देशमुख हे महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री रणजीत देशमुख यांचे पुत्र आहेत.

2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आशिष देशमुखांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसचा हात हाती धरला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात त्यांनी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली. परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सध्या ते काँग्रेसमध्येच आहेत.

इतर बातम्या:

महाराष्ट्रातील देगलूरसह देशातील 30 विधानसभा आणि तीन लोकसभा पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; 30 ऑक्टोबरला मतदान

Video: यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यात एसटी नेण्याचं चालकाचं अतिधाडस पडलं महागात, एका प्रवाशाचा मृत्यू, मदतकार्य सुरु

Congress Party may be take action against Ashish Deshmukh for anti party activities enquiry committee reach to Nagpur

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.