Nagpur – वारसास्थळांचे संवर्धन करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन, मध्यवर्ती संग्रहालयाला दिली भेट

जगभरात युनेस्कोतर्फे 19 ते 25 नोव्हेंबरदरम्यान जागतिक वारसा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. नागरिकांना विशेषत: तरुणांमध्ये देशातील प्राचीन वारसांबद्दल जनजागृती करणे हा त्यामागचा उद्देश आहे.

Nagpur - वारसास्थळांचे संवर्धन करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन, मध्यवर्ती संग्रहालयाला दिली भेट
Follow us
| Updated on: Nov 22, 2021 | 12:38 PM

नागपूर : जिल्ह्यातल्या वारसास्थळांचं संरक्षण आणि संवर्धन करा, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले. मोमीनपुरा येथील हातमाग केंद्र व मध्यवर्ती संग्रहालयाला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. त्यावेळी आझादी का अमृत महोत्सव व जागतिक वारसा दिनानिमित्त त्या काल बोलत होत्या.

जगभरात युनेस्कोतर्फे 19 ते 25 नोव्हेंबरदरम्यान जागतिक वारसा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. नागरिकांना विशेषत: तरुणांमध्ये देशातील प्राचीन वारसांबद्दल जनजागृती करणे हा त्यामागचा उद्देश आहे. शिवाय या सर्व वारसास्थळांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची प्रतिज्ञा देणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळं जिल्ह्यातल्या प्राचीन वारसास्थळांबद्दल व्यापक जनजागृती होण्यासाठी विविध उपक्रम राबवावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती करावी

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे उपसंचालक प्रशांत सवाई, मध्यवर्ती संग्रहालयाच्या अभिरक्षक जया वाहाने, सहायक अभिरक्षक विनायक निपटूरकर, चित्रकार सुचेंद्र मंडपे यावेळी उपस्थित होते. शालेय अभ्यासक्रमात जागतिक वारसास्थळांची नावे वाचलेली असतात. त्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला वाटली पाहिजे. शक्य असल्यास त्याठिकाणी प्रत्यक्ष भेटही दिली पाहिजे. अशा ठिकाणांचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. जागतिक वारसा सप्ताहाचे महत्त्व ओळखून शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रश्नमंजूषा व चित्रकला स्पर्धा आयोजित कराव्यात. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणे आणि संग्रहालयांकडून प्राचीन स्मारकांचे महत्त्व व त्यांचे जतन करण्याचा उद्देश यामागे असावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

हातमाग केंद्राला भेट

मोमीनपुरा येथील हातमाग केंद्राला जिल्हाधिकार्‍यांनी भेट दिली. तेथील हस्तनिर्मित उत्पादनांची माहिती जाणून घेतली. मध्यवर्ती संग्रहालयातील निसर्ग, पक्षी-प्राणी, हस्तशिल्प, शिल्प, प्राचीन शस्त्र, पुरातत्व, आदिवासी, अस्थायी चित्रकला या दालनांची जिल्हाधिकारी आर. विमला यांनी पाहणी केली. तसेच आवश्यक त्या सूचना दिल्या.

प्राचीन स्मारकांचे जतन करावे

भारतात 37 जागतिक वारसा स्थळे आरहेत. 29 सांस्कृतिक, तर 7 नैसर्गिक स्थळे आहेत. देशातल्या पुरातन सर्वेक्षण आणि संग्रहालयाकडून प्राचीन स्मारकांचं जतन करणं आवश्यक आहे. लाल किल्ला दिल्ली, विश्वंनाथ मंदिर काशी, दिल्ली दरवाजा, भद्रा गेट हे काही देशातले वारसा स्थळं आहेत.

किन्ही मोखे गावावर शोककळा, 17 शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे जळाले, 33 एकरातल्या धानाची झाली राखरांगोळी

नागपुरात युवा सेनेच्या नेत्यावर फसवणुकीचा गुन्हा, आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत केला होता सेनेत प्रवेश

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.