धोकादायक! जनावरांच्या गोठ्यातील मलमूत्र तलावात, तर तलावाचे दूषित पाणी नागरिकांच्या घरात, न्यायालयात घेतली धाव

तलावाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. हा तलाव प्रदूषित होण्यापासून वाचविण्यासाठी उपाययोजना करण्याचे न्यायालयाने आदेश द्यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका नितीन शेंद्रे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

धोकादायक! जनावरांच्या गोठ्यातील मलमूत्र तलावात, तर तलावाचे दूषित पाणी नागरिकांच्या घरात, न्यायालयात घेतली धाव
high court, Nagpur
Follow us
| Updated on: Dec 02, 2021 | 10:40 AM

नागपूर : अमरावती रोडवरील सुराबर्डी तलाव नागरिकांची पिण्याच्या पाण्याची तहान भागवितो. परंतु, काही लोकांच्या जनावरांच्या गोठ्यातील मलमूत्र तसेच स्मशानातील राखयुक्त पाणी याच तलावात सोडले जाते. याचा विरोध करण्यासाठी शेतकरी नितीन शेंद्रे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

सुराबर्डीतील सांडपाण्याची वाहिनी सुराबर्डीच्या तलावात सोडण्यात आली आहे. यामुळं तलावाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. हा तलाव प्रदूषित होण्यापासून वाचविण्यासाठी उपाययोजना करण्याचे न्यायालयाने आदेश द्यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका नितीन शेंद्रे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

तलावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

या तलावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळं हा आकर्षक तलाव निरुपयोगी होण्याच्या मार्गावर आहे. लावा-सुराबर्डी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत परिसरातील अनेक गावांना या तलावाचे पाणी पुरविले जाते. शौचालय, मुत्रीघरातील घाणही या तलावात सोडली जात आहे, असंही याचिकेत म्हटलं आहे.

चार आठवड्यांत उत्तर द्या

बुधवारी झालेल्या सुनावणी दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठने राज्य सरकार, जलसंपदा विभाग, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह इतर प्रतिवादींना नोटीस बजावली. यावर चार आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. सुराबर्डी तलावाचा परिसर 75.39 हेक्टर आहे. आजूबाजूच्या गावांतील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गरज हा तलाव भागवितो. पण, याच तलावात मल-मुत्रयुक्त पाणी मिसळत आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

पांदण रस्त्यावर अतिक्रमण

सुराबर्डी ग्रामपंचायतीने या तलावाजवळ दोन सिमेंटचे चबुतरे तयार केले. गावातून तलावाकडे जाणार्‍या 60 मीटर रुंदीच्या पांदण रोडवर अनेकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत, असे याचिकेत म्हटले आहे. त्यामुळं रस्ता फक्त 10 फूट उरला आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल पानसरे यांच्या खंडपीठाने नोटीस बजावली. याचिकाकर्त्यातर्फे अँड. सुधीर मालोदे आणि राज्य सरकारतर्फे अँड. केतकी जोशी यांनी बाजू मांडली.

Nagpur जेवणाची चव का बिघडली? पतीने केली पत्नीला मारहाण 

धक्कादायक! फुलपाखरांच्या संख्येत घट, अन्नसाखळी येणार धोक्यात?

Nagpur पहिल्याच दिवशी 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिक्षणाधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.