Corona | नागपुरात कोरोनाची दाहकता वाढली, रुग्णसंख्येने गाठला उच्चांकी आकडा; जाणून घ्या आजची स्थिती

नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येने उच्चांकी आकडा गाठला. गेल्या चोवीस तासांत सहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. तर चार हजारांच्या वर कोरोनाबाधित आढळल्याने कोरोनाची दाहकता अधिकच वाढली आहे.

Corona | नागपुरात कोरोनाची दाहकता वाढली, रुग्णसंख्येने गाठला उच्चांकी आकडा; जाणून घ्या आजची स्थिती
Corona
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 6:29 AM

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून मोठमोठे दावे करण्यात येत आहेत. प्रत्यक्षात नागपूर शहर व ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात येण्याऐवजी प्रचंड गतीने वाढत आहे. त्यामुळेच दैनंदिन रुग्णसंख्येचे नवनवीन रेकॉर्ड नागपुरात तयार होत आहेत. गुरुवारी तर चार मे 2021 नंतरची सर्वांत उच्चांकी म्हणजेच तब्बल चार हजार 428 नवे रुग्ण आढळलेत. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. चोवीस तासांमध्ये रुग्णसंख्येत एक हजार 132 ने वाढ झाली झाली आहे. प्रशासन कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व चाचण्यांवर भर देत आहे. प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा करीत आहे. त्यांचा हा दावा कुठेतरी प्रत्यक्षात दिसून येत नाही.

जिल्ह्यात करण्यात आल्या तेरा हजार चाचण्या

गुरुवारी जिल्ह्यात 13 हजार 848 चाचण्या करण्यात आल्यात. यामध्ये शहरात 10 हजार 17 व ग्रामीणमध्ये 3 हजार 831 चाचण्यांचा समावेश आहे. त्यापैकी तब्बल 31.98 टक्के अहवाल सकारात्मक आढळून आलेत. यामध्ये शहरातून 3 हजार 186, ग्रामीणमधून 1 हजार 153 तर जिल्ह्याबाहेरील 89 अशा ४ हजार 428 नव्या बाधितांची नोंद करण्यात आली. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 21 हजार 654 वर पोहोचली आहे.

महापालिकेची सभा पुढे ढकलली

शहराची जबाबदारी असलेल्या महापालिकेतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. महापालिकेतील अनेक अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात नगरसेवकांनाही कोरोनाचे संक्रमण झाले आहे. अनेक नगरसेवकदेखील कोविड पॉझिटिव्ह आहेत. प्रशासन आणि पदाधिकारीच आता कोरोनाच्या विळख्यात सापडलेत. त्यामुळं शहरातील ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शुक्रवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु, प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारीच बाधित आहेत. नगरसेवकही संक्रमित झाले आहेत. त्यामुळे ही सभा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही सभा येत्या 25 जानेवारी रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर शहरात कोविडचे संक्रमण वाढण्याची गती अधिक आहे.

Chandrasekhar Bavankule | पटोलेंवर गुन्हा दाखल करावा, यासाठी आंदोलन करणाऱ्या बावनकुळेंवर गुन्हा; कोविड सूचनांचे उल्लंघन केले?

Gadchiroli Election | धर्मरावबाबा, अमरीशरावांच्या अहेरीत आदिवासी विद्यार्थी संघटनेची एंट्री, महाविकास आघाडीचे वर्चस्व

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.