स्वयंरोजगारासाठी वित्त पुरवठ्याच्या महत्त्वाच्या योजना; नागपुरात कुठे आणि कसा संपर्क साधता येईल जाणून घ्या…

अनुसूचित जातींच्या सर्वांगीण विकासाकरिता सरकार प्रयत्नरत आहे. महात्मा फुले विकास महामंडळाच्या योजना अनुसूचित जातीसाठी जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी कुठे संपर्क साधायचा. कुणाला भेटायचे हे सारे जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा.

स्वयंरोजगारासाठी वित्त पुरवठ्याच्या महत्त्वाच्या योजना; नागपुरात कुठे आणि कसा संपर्क साधता येईल जाणून घ्या...
प्रातिनिधीक फोटो ((सौजन्य -महासरकार))
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 6:00 AM

नागपूर : अनुसूचित जाती (Scheduled Castes) व नवबौद्ध वर्गाच्या सर्वांगीण विकासाकरिता स्वयंरोजगारासाठी वित्त पुरवठ्याच्या दोन महत्वाच्या योजना आहेत. या योजना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाने (Mahatma Phule Backward Classes Development Corporation) जाहीर केल्या आहेत. होतकरुंना व्यवसायासाठी भांडवल पुरवणे हे या योजनांचे उद्दिष्ट आहे. मागासवर्गीयांना कोणत्याही व्यवसायासाठी कर्ज घेता येईल. मात्र अर्जदाराकडे जातीचे प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखल असणे बंधनकारक आहे. प्रकल्प एक लाखाच्या वरचा असेल तरच प्रकल्प अहवाल द्यावा लागेल. बीज भांडवल कर्ज योजनेत (Seed Capital Loan Scheme) या प्रवर्गातील पात्र व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी पाच लाखांपर्यंतचे कर्ज दिल्या जाईल. लाभार्थ्याचे स्वतःचे पाच टक्के भांडवल अनिवार्य आहे व त्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असावे. वीस टक्के भांडवल महामंडळाकडून तर उर्वरित 75 टक्के बँकेच्या कर्जातून असे या योजनेच्या वित्तपुरवठ्याचे स्वरूप आहे. केवळ चार टक्के व्याजदराने पाच वर्षांच्या कालावधीत बँकेच्या कर्जाची परतफेड करायची आहे.

50 टक्के अनुदान योजना

50 टक्के अनुदान योजनेत 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज निरंक स्वहिस्सा तत्वावर देण्यात येईल. म्हणजेच स्वतःची काहीच गुंतवणूक न करता सुद्धा छोटी रक्कम महामंडळ या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देईल. या रकमेची परतफेड तीन वर्षांच्या कालावधीत करावयाची असल्याने ही योजना गरिबातल्या गरिबाला उपयोगी ठरेल. या दोन्हीही योजनांमध्ये दहा हजार रुपयांचे अनुदान महामंडळातर्फे देण्यात येते. दोन्ही योजनांमध्ये कर्ज घेण्यासाठी अर्ज करायची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2022 आहे.

अधिक माहितीसाठी येथे साधा संपर्क

जास्तीत जास्त मागासवर्गीय नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सिद्धार्थ खोब्रागडे यांनी केले आहे. या कल्याणकारी योजनांची संपूर्ण माहिती व लाभ घेण्यासाठी महामंडळाच्या नागपूर कार्यालयास संपर्क करावा. महामंडळाच्या www.mpbcdc.maharashtra.gov.in या वेबसाईटवर सुद्धा ही माहिती उपलब्ध आहे. बी विंग 301, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आय. टी. आय. समोर, दीक्षाभूमी रोड, नागपूर असा कार्यालयाचा पत्ता आहे. 0712-2238655 या दूरध्वनी वर अथवा dmmpbcdclngp@gmail.com या मेल आय डीवर संपर्क करता येईल.

गडचिरोलीत मुलाने केला बापाचा खून; कुऱ्हाडीने सपासप वार करण्याचे कारण काय?

Nagpur | ताडोबा प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा होणार; विजय वडेट्टीवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांची भूमिका सकारात्मक

नागपुरात सात वर्षे कॅन्सरची भीती घेऊन जगली महिला; शस्त्रक्रिया केल्यावर निघाले भलतेय काही!

Non Stop LIVE Update
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...