UPSC Final Result : यूपीएससी निकालात नागपूरचा डंका, पूर्व प्रशिक्षण केंद्रातील तिघांची निवड; वर्ध्याची आकांशा यूपीएससी उत्तीर्ण

यूपीएससी परीक्षेचा निकाल 30 मे रोजी जाहीर करण्यात आला. यात महाराष्ट्रसह उपराजधानीचाही म्हणजे नागपूरचाही टक्का वाढल्याचं दिसून येत आहे. सेवाग्राम महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेची विद्यार्थिनी डॉ. आकांशा तामगाडगे हिने यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

UPSC Final Result : यूपीएससी निकालात नागपूरचा डंका, पूर्व प्रशिक्षण केंद्रातील तिघांची निवड; वर्ध्याची आकांशा यूपीएससी उत्तीर्ण
यूपीएससी निकालात नागपूरचा डंका, पूर्व प्रशिक्षण केंद्रातील तिघांची निवड
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 4:19 PM

नागपूर : नागपूरमध्ये भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र आहे. येथे तयारी करणाऱ्या सहा उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी तीन उमेदवारांनी यूपीएसी परीक्षेत यश संपादन केलं. डॉ. प्रमोद लाखे (Pramod Lakhe) यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त केलं. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत ( UNION Public Service Commission) मराठी टक्का वाढावा, यासाठी नागपुरात मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात मुंबई, नागपूर, औरंगाबाद, अमरातवी, कोल्हापूर आणि नाशिक अशा सहा ठिकाणी यूपीएससीची प्रशिक्षण केंद्र आहेत. या केंद्रांमधून परीक्षा पूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना एकरा महिने प्रशिक्षण दिलं जाते. या कालावधीत विद्यावेतनही (Scholarship) दिलं जातं. यंदा श्रृती शर्मा या मुलीनं यूपीएससी परीक्षेत प्रथम क्रमांट पटकावला. राज्यातून प्रियवंदा अशोक म्हाडदकर ही प्रथम आली. त्यात नागपूर येथे प्रशिक्षण घेतलेल्या तीन उमेदवारांचा समावेश आहे.

वर्ध्याच्या आकांशाचा समावेश

यूपीएससी परीक्षेचा निकाल 30 मे रोजी जाहीर करण्यात आला. यात महाराष्ट्रसह उपराजधानीचाही म्हणजे नागपूरचाही टक्का वाढल्याचं दिसून येत आहे. सेवाग्राम महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेची विद्यार्थिनी डॉ. आकांशा तामगाडगे हिने यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तिची देशपातळीवरील रँक 582 आहे. तिने परराष्ट्र सेवेत जाणार असल्याचं सांगितलं. एमबीबीस झाल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून ती यूपीएससीची तयारी करत होती. तिची आई माधुरी व वडील मिलिंद दोघेही डॉक्टर आहेत. ती वणी येथील राहणारी आहे.

अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी

मुख्य परीक्षेत पास झालेल्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. ही मुलाखत चाचणी 5 एप्रिल ते 25 मे 2022 या कालावधीत पार पडली. नागपूर येथील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतलेल्या 6 विद्यार्थ्यांनी ही मुलाखत दिली होती. त्यापैकी तीन जणांची निवड झाली आहे. यूपीएससीत एकूण म्हणजे देशभरातून 685 उमेदवारांची निवड करण्यात आली. अंतीम निकाल जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांनी यूपीएससी अधिकृत वेबसाईटला upsc.gov.in भेट द्यावी. एक नवीन पीडीएफ उघडेल. त्याठिकाणी पीडीएफमध्ये नाव व रोलनंबर तपासू शकतात.

हे सुद्धा वाचा

प्रशिक्षणार्थ्यांची संख्या 120

नागपूर येथील केंद्रात 2015 पूर्वी 60 उमेदवारांना प्रशिक्षण देण्याची मर्यादा होती. यात 120 उमेदवारांना दरवर्षी प्रशिक्षण दिलं जातं. आतापर्यंत या केंद्रातून 13 आयएएस, 11 आयपीएस, 2 आयएफएस, 2 भारतीय वनसेवा आणि इतर सेवांमध्ये 73 अधिकारी सेवा बजावत आहेत. त्यात आता आणखी तीन अधिकाऱ्यांची भर पडली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.