अनिल देशमुख यांनी भाजपच्या ‘या’ नेत्याला जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला, देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी अधिकाऱ्यावर दबाव टाकला आणि गिरीश महाराजांना अटक करा त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

अनिल देशमुख यांनी भाजपच्या 'या' नेत्याला जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला, देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट
Follow us
| Updated on: Sep 10, 2024 | 7:11 PM

आगामी निवडणुका तोंडावर असताना आजी-माजी गृहमंत्र्यांमधील वाकयुद्ध काही थांबताना दिसत नाहीये. शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी फडणवीसांना मला सांगायचंय की माझ्या अटकेची वाट पाहत आहे असं म्हटलं आहे. पोलीस अधिकाऱ्याला हाताशी धरून त्याच्यावर दबाव टाकत माझ्यावर खोटे आरोप करत म्हटलं होतं. यावर बोलताना फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. आमचे सरकार आल्यावर ही केस सीबीआयकडे दिली होती. अनिल देशमुख यांनी अधिकाऱ्यावर दबाव टाकला आणि गिरीश महाराजांना अटक करा त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. त्याचे सगळे पुरावे पोलीस अधीक्षक आणि त्यावेळी दिल्या नोंदी दिलेले आहे वरिष्ठाना कळवलं तेही त्यांनी दिलाय सीबीआयने ती कारवाई केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. कुठलीही चूक नसताना गिरीश महाजन यांना जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला त्यासाठी गिरीश महाजन यांची माफी मागितली पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तीन वर्षांआधी देवेंद्र फडणवीसांनी परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांना हाताशी धरत माझ्यावर आरोप करायला लावले होते. त्या दोघांनी माझ्यावर आरोप केले त्याची चौकशी झाली पण हायकोर्टाने कोणतेही पुरावे नसल्याचा निकाल दिला. आता मी पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याचा त्यांचा आरोप आहे. हे सर्व देवेंद्र फडणवीस यांचे कारस्थान असल्याचा अनिल देशमुख यांनी आरोप केला आहे.

गिरीश महाजन काय म्हणाले?

अनिल देशमुख यांची आणि माझी नार्को टेस्ट करण्यात यावी, कोण खरं बोलत आहे हे समोर येईल. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी देशमुखांविरोधात जबाब दिलेले असतानाही देशमुख खोटे दावे करत आहेत. काही लोकांच्या सांगण्यावरून काही ठराविक लोक चुकीचा नॅरेटिव्ह सेट करत असल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.