Nagpur Health : नागपुरात 132 घरी सापडल्या डेंग्यूच्या अळ्या, सोमवारी शहरातील 4 हजार 651 घरांचे सर्वेक्षण
डेंग्यू प्रतिबंधात्मक कार्यक्रमांतर्गत प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरामध्ये किंवा परिसरात कुठेही डासोत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. डेंग्यू संबंधी कुठलीही सौम्य लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
नागपूर : डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शहरात मनपाद्वारे झोननिहाय सर्वेक्षण कार्य सुरू आहे. सोमवारी 4 जुलै रोजी शहरातील 4 हजार 651 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. डेंग्यू प्रतिबंध अभियानांतर्गत मनपाच्या आरोग्य चमूद्वारे डेंग्यू बाधितांच्या निवासस्थानाजवळील परिसरामध्ये सर्वेक्षण करण्यात आले. आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. ही माहिती हिवताप व हत्तीरोग अधिकारी (Elephant Disease Officer) डॉ. जास्मीन मुलाणी (Dr. Jasmine Mulani) यांनी दिली. सोमवारी झोननिहाय पथकाद्वारे (Zone wise Squad) 4 हजार 651 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी 132 घरे ही दूषित आढळली. म्हणजेच या घरांमध्ये डेंग्यू अळी आढळून आली. याशिवाय 6 ताप असलेले रुग्ण आढळून आले. मनपाच्या चमूद्वारे 46 कुलर्स रिकामी करण्यात आले. 763 कुलर्समध्ये 1 टक्का टेमिफॉस सोल्यूशन तर 1098 कुलर्समध्ये 2 टक्के डिफ्लूबेंझ्युरोम गोळ्या टाकण्यात आले. तसेच 65 कुलर्समध्ये गप्पी मासे टाकण्यात आले.
सहा जणांना आढळला ताप
डेंग्यू प्रतिबंधात्मक कार्यक्रमांतर्गत प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरामध्ये किंवा परिसरात कुठेही डासोत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. डेंग्यू संबंधी कुठलीही सौम्य लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. पावसाळा सुरू झाला की, विशेष काळजी घ्यावी लागते. साचलेल्या पाण्यामुळं आजार होण्याची शक्यता असते. डेंग्यूच्या अळ्या या धोकादायक असतात. सहा जणांना ताप आलेला आढळून आला. मनपाने कारवाई केली आहे. त्यांचे आरोग्य पथक घरोघरी जाऊन तपासणी करत आहे. कुलर्समध्ये गप्पी मासे सोडण्यात आले.
89 किलो प्लास्टिक जप्त
नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी 22 प्रतिष्ठानांवर कारवाई केली. 1 लाख 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर, धरमपेठ,धंतोली, नेहरुनगर, गांधीबाग, सतरंजीपूरा, लकडगंज, आशिनगर आणि मंगलवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. 19 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 1 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच 89 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.