Gondia Saras| सारस पक्ष्यांबद्दल उदासीनता बरी नव्हे! उच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांना खडसावले; पुढच्या सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश

दुर्मिळ सारस पक्षी दिवसेंदिवस नामशेष होत चालला आहे. त्याच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला कडक शब्दात फटकारले.

Gondia Saras| सारस पक्ष्यांबद्दल उदासीनता बरी नव्हे! उच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांना खडसावले; पुढच्या सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश
गोंदियातील सारस पक्ष्यांची जोडी.
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 6:01 AM

गोंदिया : गोंदिया जिल्ह्याला सारस पक्षांचा (Saras Bird) जिल्हा म्हटलं जाते. या पक्ष्याबद्दल उदासीनता दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने (High Court) चांगलेच खडसावले. या पक्षाबद्दल उदासीनता दाखविणे योग्य नाही. पुढच्या सुनावणीला वेळेवर हजर राहा, असे आदेश न्यायालयानं संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

अद्याप उत्तर का सादर केले नाही

दुर्मिळ सारस पक्षी दिवसेंदिवस नामशेष होत चालला आहे. त्याच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला कडक शब्दात फटकारले. तसेच हा सार्वजनिक हिताचा विषय आहे. त्यामुळं याकडं अतिशय गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे, अशी समजही दिली. उच्च न्यायालयाने दुर्मीळ सारस पक्ष्याचे संवर्धन व संरक्षणाकरिता जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. त्यावर न्यायमुर्तीव्दयी सुनील शुक्रे व अनिल पानसरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, याचिकेचे कामकाज पाहणाऱ्या अ‍ॅड. राधिका बजाज यांनी राज्य सरकारच्या उदासीनतेकडे लक्ष वेधले. न्यायालयाने संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना 15सप्टेंबर 2021 रोजी नोटीस जारी केली होती. यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, अद्याप कुणीही स्वत:ची भूमिका मांडली नाही, असे त्यांनी सांगितले.

परसवाड्यात सापडला होता सारस पक्ष्याचा सांगाडा

न्यायालयाने ही बाब लक्षात घेता नाराजी व्यक्त केली. प्रकरणाचे गांभीर्य पाहता सरकारी अधिकाऱ्यांनी तातडीने उत्तर सादर करणे आवश्यक होते. तरीही सर्वांनी उदासीनता दाखविली. हा निष्काळजीपणा सारस पक्ष्याच्या संवर्धन व संरक्षणाकरिता घातक आहे. असे न्यायालयाने नमुद केले आहे. सारस पक्ष्याच्या मृत्युची कारणे अद्याप अज्ञात आहेत. न्यायालयाने याविषयीही चिंता व्यक्त केली. विदर्भामध्ये सध्या केवळ गोंदिया व भंडारा येथेच या पक्ष्याचे अस्तित्व टिकून आहे. सर्वाधिक सारस पक्षी गोंदिया जिल्ह्यात आढळून येतात. त्यामुळे गोंदियाला सारसांचा जिल्हादेखील म्हटले जाते. काही दिवसापूर्वी गोंदिया येथील परसवाडा तलावाजवळ एका सारस पक्ष्याचा सांगाडा आढळून आला. आधी तो पक्षी जखमी अवस्थेत दिसून आला होता. परंतु, त्याच्याकडे दुर्लक्ष झाले. प्रेमाचे प्रतीक समजले जाणारे सारस पक्षी आयुष्यभर जोडीने जगतात. त्यामुळं या मृत पक्ष्याच्या जोडीदाराचासुध्दा मृत्यू होईल, अशी माहितीही न्यायालयाला देण्यात आल्याचं गोंदियाचे मानव वन्यजीव रक्षक सावन बहेकार यांनी सांगितलं.

पाच जानेवारीला प्रत्यक्ष उपस्थित राहा

उत्तर सादर करण्यास दाखविलेली उदासीनता गंभीरतेने घेऊन उच्च न्यायालयाने गोंदिया जिल्हाधिकारी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), वनसंरक्षक, उपवनसंरक्षक व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना समन्स बजावून येत्या 5 जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता प्रकरणातील सुनावणीला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. तसेच पुढील तारखेपर्यंत सर्वांनी उत्तर सादर करावे, असा आदेशही दिला.

Nagpur Crime | एक-दोन नव्हे तब्बल 8 गाड्या चोरल्या; कारण ऐकूण पोलीसही चक्रावले!

Irrigation | पाणी अडवा, पाणी जिरवा! नागपूर जिल्ह्यात लक्ष्य 500 वनराई बंधाऱ्यांचे; 379 बंधार्‍यांचे काम पूर्ण

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.