उद्धव ठाकरे हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचले तेव्हा… देवेंद्र फडणवीस यांचा घणाघाती हल्ला

नवनीत राणांचा पराभव झाला याचं वाईट वाटलं. पण विरोधकांनी काय केलं हे बघितलं पाहिजे. अमरावतीत राजकमल चौकात काय केलं हे तुम्ही बघितलं असेल. हिंदू समाजाला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अरे वेड्यांनो तुम्हाला फिरण अवघड जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

उद्धव ठाकरे हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचले तेव्हा... देवेंद्र फडणवीस यांचा घणाघाती हल्ला
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 03, 2024 | 8:31 PM

मी ढेकणाच्या नादाला लागत नाही. ढेकणाला बोटाने चिरडलं जातं. तुझ्या नादाला लागण्याएवढ्या कुवतीचा तू झालेला नाही, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांच्या या हल्ल्याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे जेव्हा हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचले तेव्हा आम्हाला दुःख झालं. कुठल्या जातीच लांगूलचालन आम्हाला जमत नाही. विशिष्ट समाजाचं लांगूलचालन करून आम्ही मते घेत नाही, असं सांगतानाच हा एक प्रयोग आहे. कर्नाटकात हा प्रयोग झाला. त्यामुळे गाफील राहिलं की खिंडीत गाठता येतं. आता आम्ही गाफील राहणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अमरावती येथे भाजपची बैठक होती. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी डॉ. अनिल बोंडेंना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तर नवनीत राणा यांना अमरावतीच्या माजी खासदार म्हणणं आम्हाला जड जातं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकाचा आढावा घेतला. काय करायचं आणि काय नाही याच्या सूचना सर्वांना दिल्या आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

चौथ्या पक्षाविरुद्ध लढाई

लोकसभेच्या पराभवाने कार्यकर्त्यांमध्ये निराशा आहे. संपूर्ण देशाने मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मान दिला आहे. पंडित नेहरूनंतर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. पण महाराष्ट्रात आपण कमी पडलो याची खंत राहील. आता तीन पक्षांसोबत नाहीतर चार पक्षांसोबत आपली लढाई आहे. हा चौथा पक्ष म्हणजे खोटा नरेटिव्ह आहे. या नरेटिव्ह विरोधात आपल्याला सामना करावा लागणार आहे, असं फडणवीस म्हणाले.

दोन लाख मतांनी जागा कमी

खोट्या नरेटिव्हला उत्तर द्यायला आपण कमी पडलो. महाराष्ट्राचा विचार केला तर महायुती, महाविकास आघाडीतला फरक 0.3 टक्क्यांचा आहे. आपल्याला 2 कोटी 48 लाख मते मिळाली. त्यांना 2 कोटी 50 लाख मते मिळाली. केवळ 2 लाख मतांनी आपल्या जागा कमी झाल्या, अशी माहिती त्यांनी दिली.

बाजारू विचारवंतांनी…

दलित, आदिवासींच आरक्षण काढून टाकणार असल्याचं त्यांनी सांगितलं. संविधान बदलण्यासाठी आपण 400 पारचा नारा दिल्याचा फेक नरेटिव्ह त्यांनी तयार केला. यावेळी त्यांच्या लक्षात आलं की, जनतेचा त्यांच्यावर विश्वास बसणार नाही. त्यामुळे त्यांनी एक इकोसीस्टम तयार केली. काही तथाकथित बाजारू विचारवंतांनी भाजप संविधान बदलणार म्हणून प्रचार केला. लोकांना खोटं सांगून मतं घेतली, असं ते म्हणाले.

तेव्हा पैसे झाडाला लागले होते का?

यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांवर हल्ला चढवला. काँग्रेस नेते लाडकी बहीण योजने विरोधात कोर्टात गेले. आम्ही बहिणींच्या खात्यात 1500 टाकतोय. मग तुमच्या पोटात काय दुखतं? राहुल गांधी खटाखट टाकणार होते, ते पैसे काय झाडाला लागले होते? आम्ही कुणालाही वंचित ठेवणार नाही. हे सरकार बहिणींच्या पाठीशी उभा राहणारं सरकार आहे. बहिणींना 50 % सुट दिल्याने जास्त महिला एसटीने प्रवास करायला लागल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

सत्ता आणून दाखवतो

आपण जर या मैदानात जिंकलो तर कुणीही आपल्याला आव्हान देऊ शकणार नाही. हे लोक सत्तेत आले की, पैसा जमा करतात. सत्ता गेली की गरीब आठवतो. 60-65 वर्षांत शेतकरी, गरीब का आठवला नाही?सत्तेवरून गेले की पोपट बोलायला सुरुवात करतात. सत्तेत आले की घर भरणं, तिजोऱ्या भरणं सुरू होतं. पैशातन सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच यांचं लक्ष आहे, असं सांगतानाच पुन्हा एकदा सत्ता आणून दाखवतो, असं फडणवीस म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.