मलिकांवरून महायुतीत ठिणगी? आमच्या भावनांची नोंद घ्या…, देवेंद्र फडणवीसांचा लेटरबॉम्ब

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पाठवलेल्या पत्रावरुन महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना महायुतीत सहभागी करुन घेण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. "आपल्या पक्षात कुणाला घ्यावं हा तुमचा प्रश्न आहे.पण त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो", असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिलाय.

मलिकांवरून महायुतीत ठिणगी? आमच्या भावनांची नोंद घ्या..., देवेंद्र फडणवीसांचा लेटरबॉम्ब
Follow us
| Updated on: Dec 07, 2023 | 7:20 PM

नागपूर | 7 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक आज हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात आले. ते आज सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या आमदारांच्या जवळ बसले. तसेच ते अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांच्या कार्यालयात बसले. त्यामुळे नवाब मलिक यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं चित्र दिसलं. यावरुन ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र पाठवून सविस्तर भूमिका मांडली आहे. खरंतर देवेंद्र फडणीस यांचा हा लेटरबॉम्ब असल्यासारखंच मानलं जात आहे. कारण अजित पवारांनी नवाब मलिकांचं आपल्या पक्षात स्वागत केलं, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना महायुतीत सहभागी करुन घेण्यास विरोध दर्शवला आहे.

नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटात जाणार? याबाबत सारखी चर्चा सुरु होती. या प्रश्नाचं उत्तर आज सर्वांना मिळालं. नवाब मलिक सत्ताधारी आमदारांच्या बाकावर बसले. त्यामुळे ते अजित पवार गटात सहभागी झाले. पण नवाब मलिकांना सत्तेत सहभागी करुन घेऊ नका. त्यांच्या देशद्रोहासारखे आरोप आहेत. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. आपल्या पक्षात कुणाला घ्यावं हा तुमचा प्रश्न आहे.पण त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला. तसेच “आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे”, असंही फडणवीस आपल्या पत्रात म्हणाले आहेत.

‘त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही’

“माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. पण ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही”, असे आमचे मत आहे, असं देवेंद्र फडणवीस पत्रात म्हणाले.

‘आमचा विरोध’

“सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे. हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतू, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे”, असं फडणवीसांनी पत्रात स्पष्ट केलं.

‘आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल’

“त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे”, असं देवेंद्र फडणवीस पत्रात म्हणाले आहेत.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.