गृहमंत्री अनिल देशमुखांचीही चौकशी होणार का?; देवेंद्र फडणवीसांचा पवारांना सवाल

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. (devendra fadnavis reaction on sharad pawar statement)

गृहमंत्री अनिल देशमुखांचीही चौकशी होणार का?; देवेंद्र फडणवीसांचा पवारांना सवाल
Ddevendra Fadnavis
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 3:48 PM

नागपूर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ज्युलिओ रिबेरो सारख्या अधिकाऱ्यांमार्फत ही चौकशी करण्यात यावी अशी मागणी पवार यांनी केली आहे. या प्रकरणात केवळ परमबीर सिंग यांची चौकशी होणार की गृहमंत्र्यांचीही चौकशी होणार आहे? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. जोपर्यंत देशमुख यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहिल असा इशाराही त्यांनी दिला. (devendra fadnavis reaction on sharad pawar statement)

दिल्लीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेऊन थेट पवारांनाच सवाल केले आहेत. ज्युलिओ रिबेरो चांगले अधिकारी आहेत. हे हुशार आहेत. पण अनेक वर्षांपूर्वी निवृत्त झालेले डीजी रँकचे अधिकारी गृहमंत्र्यांची चौकशी कशी करणार? असा सवाल करतानाच केवळ परमबीर सिंग यांची चौकशी होणार आहे की देशमुख यांचीही चौकशी होणार आहे. त्याचा खुलासा पवारांनी करावा, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

तोपर्यंत आंदोलन

अनिल देशमुख हे गृहमंत्री आहेत. ते पदावर असेपर्यंत त्यांची चौकशी होऊच शकत नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेऊनच चौकशी करण्यात यावी, जोपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पवारांचं अर्धसत्य

वाझेंची नियुक्ती सिंग यांनी केल्याचं पवारांनी सांगितलं. ते खरं आहे. पवारांनी सत्य सांगितलं. पण ते अर्धसत्य आहे. सिंग यांच्या समितीनेच वाझे यांना पदावर घेतलं. मात्र राज्य सरकारच्या आदेशानंतरच त्यांनी वाझे यांना पदावर घेतलं होतं. हे सत्य असून पवारांनी हे सत्य सांगितलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

गाड्या कोण वापरत होतं

सचिन वाझेंकडे आलिशान गाड्या सापडल्या आहेत. गेल्या सहा-आठ महिन्यात या गाड्या कोण कोण मोठे लोक वापरत होते, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

बदल्यांच्या रॅकेटवर कारवाई का नाही

परमबीर सिंग यांची बदली झाल्याने त्यांनी आरोप केल्याचं पवार म्हणत आहे. परंतु या आधी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी आरोप केले होते, त्यांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. सुबोध जैस्वाल यांनी बदल्यांच्या रॅकेटबाबत सरकारला अहवाल दिला आहे. त्यावर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवालही त्यांनी केला, असंही ते म्हणाले. (devendra fadnavis reaction on sharad pawar statement)

संबंधित बातम्या:

‘लेटरबॉम्ब’प्रकरणाची ज्युलिओ रिबेरो सारख्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी व्हावी: शरद पवार

सचिन वाझेंना पोलीस दलात घेण्याचा निर्णय परमबीर सिंग यांचाच : शरद पवार

Raj Thackeray | राज ठाकरेंच्या ‘त्या’ 10 सवालांचं उत्तर देणार का उद्धव ठाकरे सरकार? वाचा ते सवाल

(devendra fadnavis reaction on sharad pawar statement)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.