VIDEO: राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलत आहे ना?; देवेंद्र फडणवीसांचा नवाब मलिक यांना टोला
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे भाजपचे पोपट आहेत. भाजपचा जीव त्या पोपटात अडकला आहे, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला होता. (devendra fadnavis reply to nawab malik over aryan khan case)
नागपूर: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे भाजपचे पोपट आहेत. भाजपचा जीव त्या पोपटात अडकला आहे, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला होता. मलिक यांच्या या टोल्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रति टोला लगावला आहे. राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलत आहे ना? असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला. राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलत आहे ना? कोण कोणाचा पोपट आहे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल. आमच्यासाठी नाही, असं फडणवीस म्हणाले.
मलिकांना काम नाही
नवाब मलिक दिवसभर काही तरी बोलत असतात. आता सध्या त्यांना दुसरं काही काम नाही. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक विधानावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, असं सांगत फडणवीस यांनी मलिक यांच्या विधानावर अधिक बोलणं टाळलं.
मलिक नेमकं काय म्हणाले?
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवरही जोरदार हल्ला चढवला. येत्या 7 डिसेंबर रोजी अधिवेशन होणार आहे. त्यावेळी माझ्यावर हल्ले केले जातील. माझ्या जावयाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पण आता मी काही बोलणार नाही. मला विषयांतर करायचे नाही. हे जे काही पोपट आहे. त्याचा पोपट केल्यानंतर बरेच्या गोष्टी बाहेर येणार आहेत. हिवाळी अधिवेशनात अनेक मोठी नावे उघड होणार आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. पोपटाला वाचवण्यासाठी सर्व लोक पुढे पुढे पळत आहेत. पण विधानसभेत सर्व परिस्थिती समोर आल्यानंतर यांना महाराष्ट्राला तोंड दाखवता येणार नाही, तसे माझे प्रयत्न सुरू आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही
काशिफ खानकडे किती लोकांचे पैसे आहेत. त्याच्या माध्यमातून काय काय होते… काशिफ खानची कसून चौकशी झाली तर बरंचसं काय यातून उघड होणार आहे. काही हत्यार माझ्याकडे राहू द्या. विधानसभा अधिवेशन वादळी ठरणार आहे. आता बोललो तर काही लोक कोर्ट कचेऱ्यात जातील. त्यामुळेच विधानसभेत मी काही गोष्टी मांडणार आहे. तेव्हा या लोकांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असं मलिक म्हणाले.
गोसावी आणि भाजप नेत्याच्या पत्नीची पार्टनरशीप
गोसावी आणि भाजपच्या एका नेत्याची एका खासगी कंपनीत पार्टनरशीप आहे. त्यांची बायको गोसावीच्या एका कंपनीत पार्टनर आहे. मी आता त्यांचं नाव घेणार नाही. विधानसभेत हे नाव सांगू. पिक्चरचा शेवट जो बोगस आणि फर्जी माणूस आहे त्याची नोकरी जाणे, त्याला तुरुंगात टाकणे, हे यंत्रणेच्या माध्यमातून नाही. बोगस सर्टिफिकेटच्या आधारे बोलतोय. पिक्चरचा शेवट केव्हा होईल जेव्हा निरपराध लोक तुरुंगातून बाहेर येत नाही आणि या सर्व केसेसे कशा फेक आहेत हे जोपर्यंत सिद्ध होत नाही, तोपर्यंत या पिक्चरचा शोध होणार नाही, असं ते म्हणाले.
संबंधित बातम्या:
महिन्याभरात परिस्थिती बदलली, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त; नवाब मलिक यांचा इशारा
(devendra fadnavis reply to nawab malik over aryan khan case)