Clean Nagpur | घरीच करा कचऱ्याची विल्हेवाट, अन्यथा 15 पासून कचरा उचलणार नाही?

नागरिकांकडून स्वच्छता दूताला मिश्रीत कचरा दिला जात आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेने आता फक्त सुका आणि ओला असा वेगवेगळा केलेला कचरा स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

Clean Nagpur | घरीच करा कचऱ्याची विल्हेवाट, अन्यथा 15 पासून कचरा उचलणार नाही?
ओला आणि सुका कचऱ्यातील फरक स्पष्ट करून सांगताना मनपाचे कर्मचारी.
Follow us
| Updated on: Dec 12, 2021 | 9:52 AM

नागपूर : महापालिकेतर्फे कचरा संकलन करणाऱ्या गाडीत ओला आणि सुका कचऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र काही नागरिक घरातील कचऱ्याचे विलगीकरण न करताच स्वच्छता दूताकडे देतात. त्यामुळं मनपद्वारे ओला आणि सुका कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. 15 डिसेंबरपासून विलगीकृत नसलेला कचरा नागरिकांकडून स्वीकारू नका, असे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शनिवारी स्वच्छता विभागाला दिले. तसेच नागरिकांनीसुद्धा आपल्या घरातील कचरा वेगवेगळा करूनच द्यावा, असे आवाहनही यावेळी मनपा आयुक्तांनी केले.

नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून स्वच्छता दूताकडे द्यावा, असे निवेदन मनपातर्फे वेळोवेळी करण्यात आले होते. तरीसुद्धा नागरिकांकडून स्वच्छता दूताला मिश्रीत कचरा दिला जात आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेने आता फक्त सुका आणि ओला असा वेगवेगळा केलेला कचरा स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

ओल्या-सुक्या कचऱ्यातील फरक

ओल्या कचऱ्यामध्ये खराब फळे, भाज्या, उरलेले अन्न, अंड्याचे कवच, नारळ, शहाळी, हाडे अशा विघटन होणाऱ्या बाबीचा समावेश होतो. तर सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टीक पिशव्या, रबर, थर्माकोल, काचेच्या बाटल्या तसेच काच, बॅटरी सेल, धातू, खिळे अशा गोष्टींचा समावेश होतो.

सक्रिय सहभाग घ्या

पालिका क्षेत्रातील सोसायट्या, हॉटेल, व्यापारी संस्था तसेच नागरिकांना ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याबाबत विस्तृत माहिती देण्यात आली आहे. नागरिकांनी ओला कचरा प्लास्टिक पिशवीमध्ये न देता ओला व सुका कचरा विलगीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा.

घातक कचऱ्यानं पर्यावरणाची हानी

घरोघरी लहान मुलं, वयोवृद्ध व्यक्ती यांच्याकरिता वापरले जाणारे डायपर्स, सॅनिटरी नॅपकीन, बॅटरी सेल, रंगाचे डबे, केमिकल स्प्रे, जंतुनाशके, औषधांच्या रिकाम्या बाटल्या अशा प्रकारच्या घातक कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट करणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा कचऱ्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी पर्यावरणाच्या दृष्टीने विघातक असलेल्या घरगुती घातक कचऱ्याचे ओला व सुका या व्यतिरिक्त स्वतंत्र संकलन करण्यात येतो. त्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्याचे महानगरपालिकेने निश्चित केले आहे. आशा प्रकारचा कचरा वेगळ्या लाल रंगाच्या बकेटमध्ये गोळा करावा.

Love breakup | प्रेयसीशी जबरदस्तीचा प्रयत्न; नकार देताच गळफास लावला पण…

Chandrapur | भद्रावतीचा तहसीलदार अडकला जाळ्यात; 25 हजार रुपयांची घेत होता लाच

Nagpur | ऑटोरिक्षाच्या भाववाढीवरून चालक-ग्राहकांत मतभेद, मध्यम मार्ग निघणार कसा?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.