तब्बल 50 लाखाच्या हुंड्याची मागणी, कंटाळून डॉक्टर महिलेने जीव सोडला, डॉक्टर पतीला बेड्या

नागपुरात हुंडाबळीचा प्रकार समोर आला समोर आला आहे (Doctor woman commits suicide due to dowry).

तब्बल 50 लाखाच्या हुंड्याची मागणी, कंटाळून डॉक्टर महिलेने जीव सोडला, डॉक्टर पतीला बेड्या
नाना हंडाळ पुणे शहर पोलीस दलात पोलीस नाईक म्हणून काम करत होते.
Follow us
| Updated on: Dec 24, 2020 | 6:02 PM

नागपूर : नागपुरात हुंडाबळीचा प्रकार समोर आला समोर आला आहे. पतीच्या तब्बल 50 लाख रुपयांच्या मागणीला कंटाळून विवाहित डॉक्टर महिलेने आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे महिलेचा पतीदेखील पेशाने डॉक्टर आहे. मात्र, तरीदेखील त्याच्याकडून हुंड्यासाठी पत्नीचा छळ केला जात होता. पतीच्या जाचाला कंटाळून महिलेने अखेर आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे (Doctor woman commits suicide due to dowry).

नागपूर शहरातील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरेंद्र नगरच्या उपेंद्र अपार्टमेंट येथे राहणाऱ्या डॉक्टर रुची मंगेश रेवतकर महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या महिलेचा नवरादेखील डॉक्टर आहे. मंगेश रेवतकर असे त्याचे नाव असून त्याने त्याची पत्नी रुचीकडे 50 लाख रुपये माहेरून आणण्यासाठी तगादा लावला होता (Doctor woman commits suicide due to dowry).

रुची आणि मंगेश यांचा 2016 मध्ये विवाह झाला. व्यवसायाने दोघेही डॉक्टर असल्याने त्यांचा संसार सुखाचा होईल, अशी स्वप्ने रुचीच्या आई-वडिलांच्या बघितले होते. मात्र लग्नाच्या काही दिवसानंतरच मंगेशने आपले खरे रूप दाखवायला सुरुवात केली. मंगेशने रुचीला माहेरून पैसे आणण्यासाठी अनेकवेळा भाग पाडले होते. सुरुवातीला छोटी-मोठी नड असल्याचं समजून रुचीच्या आई-वडिलांनी त्याच्या मागण्या पूर्ण केल्या.

रुचीला मुलगा झाल्यानंतर नवऱ्याकडून त्रास होणार नाही, या आशेवर तिने पुन्हा संसाराला सुरुवात केली. मात्र मंगेशमधील लालचीपणा आणखीच वाढला. तो रुचीला माहेरून पैसे आणण्यासाठी सारखा त्रास देत होता. तो मारहाणदेखील करायचा. हे प्रकार तब्बल चार महिने सुरू होते. रुचीने आत्महत्या केल्यादिवशी सुद्धा आरोपीने डॉक्टर रुचीला पैशासाठी मारहाण केली. त्यावेळी रूचीने तिच्या आईला फोन करून सर्व घटनाक्रम सांगितला. हा फोन झाल्याच्या 15 मिनिटांनी रूचीने आत्महत्या केल्याचीच बातमी त्यांच्या कानी पडली.

रुचीच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळ गेले. पोलिसांना त्याठिकाणी एक सुसाईड नोट आढळून आली आहे. ज्यामध्ये तिच्यावर सुरू असलेल्या अत्याचाराचा सविस्तरपणे उल्लेख करण्यात आला आहे. या घटनेनंतर रुचीची आई अल्का सुरेश कवडे यांच्या तक्रारीवरून मंगेश रेवतकर विरुद्ध हुंड्याकरिता पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आता पतीला अटक केली आहे.

आपला समाज शिक्षित होत आहे. अनिष्ट चालीरीतींना मूठमाती दिली जात आहे. मात्र अजूनही हुंड्याकरिता पत्नीचा छळ करण्याच्या संतापजनक घटना आपल्या सुसंकृत समाजामध्ये सातत्याने घडत आहेत. नवरा आणि बायको डॉक्टर असल्याने दोघांचा पगार समाधानकारक होता. मात्र बायकोने माहेरून पैसे आणावे आणि त्या भरवश्यावर स्वतःच्या स्वप्नांची पूर्तता करानी या विकृत मानसिकतेचे उच्च शिक्षित असलेले तरुण समाजाला लागलेली कीड आहे, असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही.

हेही वाचा : अल्पवयीन ट्रान्सजेंडरने केली आत्महत्या, शाळेत स्कर्टवरून झाला होता अपमान; Video Viral

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.