Nagpur अवयवदान श्रेष्ठ दान : किडनी आणि यकृत दानातून दोघांना जीवनदान

| Updated on: Dec 01, 2021 | 4:00 PM

भांडेवाडीच्या भावना बालमुकुंद केयाल यांच्या मेंदूपेशी मृत झाल्या होत्या. याबाबत डॉक्टरांनी निदान केले. भावनाच्या अवयवदानातून दुसऱ्याला जीवदान देण्याचा निर्णय पती बालमुकुंद यांनी घेतला.

Nagpur अवयवदान श्रेष्ठ दान : किडनी आणि यकृत दानातून दोघांना जीवनदान
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

नागपूर : शहर अवयवदानाचे केंद्र बनत चाललंय. 48 वर्षीय महिला मेंदूमृत झाली. याची माहिती तिच्या पतीला देण्यात आली. पतीनं समुपदेशनानंतर अवयवदानाचा संकल्प केला. त्यांच्या पत्नीच्या किडनी आणि यकृतातून दोघांना जीवनदान मिळाले. शिवाय नेत्रदानातून आणखी दोघांना हे जग पाहत येणार आहे.

भांडेवाडीच्या भावना बालमुकुंद केयाल यांच्या मेंदूपेशी मृत झाल्या होत्या. याबाबत डॉक्टरांनी निदान केले. भावनाच्या अवयवदानातून दुसऱ्याला जीवदान देण्याचा निर्णय पती बालमुकुंद यांनी घेतला. भावना यांच्या किडनी आणि यकृतदानातून दोघांना जीवनदान मिळाले. नेत्रदानातून दोन दृष्टिहीनांना जग बघता येणार आहे.

 

महिलेच्या पतीचे समुपदेशन

न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये यकृत आणि किडनीच्या प्रतीक्षेत दोघे जण होते. त्यांना भावना यांच्या यकृत आणि किडनीचा फायदा झाला. भावना यांच्या मेंदूवर चार वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 25 नोव्हेंबरला प्रकृती बिघडल्यानं त्यांना न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र 29 नोव्हेंबरला उपचाराला दाद मिळत नसल्याचे पुढे आले. डॉक्टरांनी मेंदूमृत्यूची तपासणी केली असता सर्व पेशी मृत झाल्याचे लक्षात आले. भावना यांचे पती बालमुकुंद यांना अवयवदानासंदर्भात न्यू ईरा हॉस्पिटलटमधील ह्रदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. आनंद संचेती, मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. नीलेश अग्रवाल यांनी समुपदेशन केले.

 

एकाला यकृत, तर दुसऱ्याला किडनी

अवयवदानास होकार दिल्यानंतर विभागीय प्रत्यारोपण समितीच्या अध्यक्षा डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. संजय कोलते यांना सूचना दिली. समन्वयक विना वाठोरे यांनी कुटुंबीयांशी संवाद साधल्यानंतर अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेली यादी तपासली. न्यू ईरा रुग्णालयातील एका 56 वर्षीय पुरुष यकृत तर 54 वर्षीय महिला किडनीच्या प्रतीक्षेत होते. यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया डॉ. राहुल सक्सेना, डॉ. साहिल बन्सल, डॉ. स्नेहा खाडे यांनी केली. तर किडनी प्रत्यारोपण डॉ. प्रकाश खेतान, डॉ. रवी देशमुख, डॉ. शब्बीर राजा यांनी केले.

Nagpur Mission Vatsalya प्रत्येक अधिकाऱ्याने घ्यावी एका बालकाची जबाबदारी, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन स्वीकारणार का? 

Nagpur आनंदवार्ता : बालगोपालांचे शाळेत उत्साहात स्वागत, तब्बल पावणेदोन वर्षांनंतर अनुभवली शाळा