Corona Alert | नागपुरात कोरोना बाधित दुप्पट, जमावबंदी मंगळवारपासून लागू; काय असतील निर्बंध?

नागपुरात सिनेमागृह, नाट्यगृह रात्री 12 वाजतापर्यंत क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीत सुरू असतील. रेस्टॉरंट, उपहारगृहे रात्री बारापर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील, असं सुधारित आदेशात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कळविले आहे.

Corona Alert | नागपुरात कोरोना बाधित दुप्पट, जमावबंदी मंगळवारपासून लागू; काय असतील निर्बंध?
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 6:06 AM

नागपूर : नागपूर जिल्ह्यात शुक्रवारी 12 कोरोनाबाधित सापडले होते. तर शनिवारी ही संख्या 24 झाली. त्यामुळं प्रशासन अलर्ट झालंय. जिल्हा प्रशासनानं उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेत जमावबंदीसह नवीन निर्बंध जारी केलेत. हे आदेश मंगळवारी, 28 डिसेंबरच्या रात्री नऊ वाजतानंतर लागू होतील. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी नागपूरमधील एम्स, मेडिकल, मेयो हॉस्पिटलला प्रत्यक्ष भेट दिली. आणीबाणीच्या परिस्थितीत कोविड वॉर्ड पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची पूर्वतयारी करण्याच्या सूचना दिल्या.

दुकाने व शॉपिंग मॉल रात्री नऊपर्यंत

नागपूर जिल्ह्यात ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं राज्य शासनानं घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच गर्दी नियंत्रणात आणणे आवश्यक आहे. त्यामुळं रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आर. विमला यांनी जारी केले. यामध्ये दुकाने व शॉपिंग मॉल रात्री नऊपर्यंत सुरु असतील. क्रीडा स्पर्धा प्रेक्षकांशिवाय रात्री नऊवाजेपर्यंत असतील.

कार्यक्रमाची कमाल मर्यादा 100, खुल्या जागेसाठी 250

सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजन, राजकीय, धार्मिक कार्यक्रम, मेळावा यांना देखील रात्री नऊ वाजेपर्यंत मर्यादा ठेवण्यात आली आहे. बंदिस्त जागेच्या 50 टक्के उपस्थितीत हे कार्यक्रम घेता येतील. तथापि, या कार्यक्रमाची कमाल मर्यादा 100 पेक्षा अधिक असता कामा नये. खुल्या जागेवर हे कार्यक्रम होत असल्यास क्षमतेच्या 25 टक्के मात्र 250 पेक्षा अधिक संख्या असता कामा नये.

अंत्यविधीसाठी 50 व्यक्तींची मर्यादा

विवाह सोहळ्यांमध्ये देखील बंदिस्त जागेसाठी 100 आणि खुल्या जागेत 250 लोकांची मर्यादा निर्धारित करण्यात आली आहे. अंत्यविधीसाठी 50 व्यक्तींची कमाल मर्यादा पाळण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यांच्या बैठका व निवडणुकांसाठी 100 लोकांची मर्यादा बंदिस्त जागेसाठी व 250 लोकांची मर्यादा खुल्या जागेसाठी निर्धारित करण्यात आली आहे. व्यायामशाळा, सलून, ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर, योगा सेंटर 50 टक्के क्षमतेने रात्री नऊ वाजेपर्यंत सुरु असतील.

शाळा, महाविद्यालये सुरू राहतील

सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था सुरु असेल. मात्र उभ्याने प्रवास करता येणार नाही. आंतरजिल्हा प्रवास नियमितपणे सुरु राहील. शाळा, महाविद्यालये शासनाने निर्गमित केलेल्या सूचनेनुसार सुरु राहतील. तथापि, कोचिंग क्लासेसला रात्री नऊ वाजेपर्यंतची मर्यादा राहील. विद्यार्थी संख्या 100 पेक्षा अधिक असू नये. धार्मिक स्थळे रात्री नऊ वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र, याठिकाणी देखील 100 पेक्षा अधिक नागरिकांच्या उपस्थितीला मर्यादा कळण्यात आल्या आहेत. अम्युझमेंट व वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेने, कमाल मर्यादा 100 ठेवून सुरु राहतील. ग्रंथालय, अभ्यासिका रात्री नऊ वाजेपर्यंत 100 कमाल मर्यादेत सुरु राहतील.

रॅली, यात्रेवर बंदीचा निर्णय

शासकीय, निमशासकीय प्रशिक्षण संस्था, आरोग्य कर्मचाऱ्यांकरिता कौशल्य विकास संस्था 50 टक्के क्षमतेने 100 लोकांच्या मर्यादेत सुरु राहतील. जलतरण तलाव बंद करण्याची सूचना आहे. तसेच रॅली व यात्रा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नागरिकांनी या परिस्थितीत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना पाळत सहकार्य करावे. मास्कशिवाय व गरजेशिवाय बाहेर पडू नये.

Baba Amte | आधुनिक भारताचे संत बाबा आमटे; कुष्ठरोग्यांच्या जीवनात कसा फुलविला आनंद?

हिवाळी अधिवेशनात कोरोनाचा शिरकाव, समीर मेघे कोरोना पॉझिटिव्ह, अधिवेशन गुंडाळावं लागणार?

Nitin Raut | राज्यात काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची शक्यता, राऊतांना काँग्रेसनं एससी सेलमधून हटवलं, विधानसभा अध्यक्ष होणार?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.