Nagpur NMC | नागपूर मनपा निवडणुकीची धूळवड; भाजपचे किती नगरसेवक निवडून आणण्याचे टार्गेट?
नागपूर : महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपने कंबर कसलीय. प्रभाग बदलानंतर तिकीटासाठी दावेदारांची संख्या वाढलीय. त्यामुळे भाजपने तिकिटाची मागणी करणाऱ्यांना घरोघरी जाऊन संपर्क करण्याचे निर्देश दिलेत. आगामी मनपा निवडणुकीत भाजपने 120 जागांचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले. त्यानुसार नियोजन करण्याची सूचना भाजप नेत्यांनी दिलीय. भाजपचे नवनियुक्त संयोजक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत इच्छूक उमेदवारांना घरोघरी जाऊन […]
नागपूर : महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपने कंबर कसलीय. प्रभाग बदलानंतर तिकीटासाठी दावेदारांची संख्या वाढलीय. त्यामुळे भाजपने तिकिटाची मागणी करणाऱ्यांना घरोघरी जाऊन संपर्क करण्याचे निर्देश दिलेत. आगामी मनपा निवडणुकीत भाजपने 120 जागांचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले. त्यानुसार नियोजन करण्याची सूचना भाजप नेत्यांनी दिलीय. भाजपचे नवनियुक्त संयोजक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत इच्छूक उमेदवारांना घरोघरी जाऊन संपर्क करण्याचे निर्देश दिलेत, अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली. नागपूर महापालिका (Municipal Corporation) निवडणूक ( Election) सहा महिन्यांवर आलीय. या निवडणुकीत भाजप सुमारे 25 टक्के उमेदवार बदलणार आहे. त्यामुळं नागपूरमधील भाजप नगरसेवकांची (Corporator) धाकधूक वाढली आहे. तिकीट कट होणाऱ्या उमेदवारांमध्ये आपला नंबर लागू नये, अशी इच्छा सगळेच भाजप नगरसेवक व्यक्त करत आहेत.
बदल गरजेचा तो सर्व्हेनुसार होईल
समाधानकारक कामगिरी नसलेल्या नगरसेवकांना भाजप नारळ देणार आहे. तीनच्या प्रभाग पद्धतीचं स्वागत करताना, नागपूर भाजपने हा मोठा निर्णय घेतला आहे. प्रत्येक निवडणुकीत 15 ते 20 टक्के उमेदवारांचं तिकीट बदललं जातं. त्यात नवीन काही नाही. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी काही बदल करावे लागतात. त्यामुळं कुणी नाराज होण्याचा प्रश्न नाही. समाधानकारण कामगिरी न केलेल्या नगरसेवकांना भाजप वगळणार आहे. मिशन 120 नगरसेवक निवडूण आणायचं असेल, तर हे करावं लागेल, असं महापौर म्हणाले.
सध्याचे नागपूर मनपाचे पक्षीय बलाबल
नागपूर महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या सर्व विधानसभा मतदारसंघात भाजपच्या वतीनं तरुणांचे मेळावे घेण्यात आले. आता सर्वे करण्यात येत आहे. भाजपनं हे एक प्रकारे मिशन नागपूर महापालिका आहे. भाजप नागपूर जिल्ह्यात 50 हजार तरुणांची युवा वॅारियर्सची फळी तयार करत आहे. प्रत्येक बूथवर 25 तरुणांची फळी काम करेल. नागपूर मनपात एकूण सदस्यसंख्या 151 आहे. त्यापैकी भाजपकडं 108 नगरसेवक आहेत. त्यामध्ये आता वाढ करण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. काँग्रेसकडे 29, तर बसपाकडे दहा नगरसेवक आहेत. अपक्ष 4 नगरसेवक आहेत.