ED Raid : फडणवीसांच्या विरोधात बोलल्यामुळेच ईडीची रेड, सुनेलाही धक्काबुक्की, सतीश उकेंच्या वडिलांचे गंभीर आरोप
आता सतीश उकेंच्या वडिलांनीही ईडीवर (ED Raid) काही गंभीर आरोप केले आहेत. सकाळी 5 वाजता ईडीचे काही अधिकारी आम्ही झोपेत असताना आमच्या घरात आले. माझ्या सुनेला अधिकाऱ्यानी धक्काबुक्की करत घरामध्ये घुसले. असे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत.
नागपूर : नागपुरातले प्रसिद्ध वकील सतीश उके (Satish Uke) यांच्या घरी आधी ईडीची रेड पडली, त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर नाना पटोले (Nana Patole) यांनी पहिली तिखट प्रतिक्रिया दिली. मात्र आता सतीश उकेंच्या वडिलांनीही ईडीवर (ED Raid) काही गंभीर आरोप केले आहेत. सकाळी 5 वाजता ईडीचे काही अधिकारी आम्ही झोपेत असताना आमच्या घरात आले. माझ्या सुनेला अधिकाऱ्यानी धक्काबुक्की करत घरामध्ये घुसले. फडणवीस यांच्या विरोधात तुम्ही बोलत आहात. त्याचमुळे तुमच्या घरी ईडीची रेड पडत आहे, असं त्यांनी सांगितलं, असा खळबळजनक दावा सतीश उके यांच्या वडिलांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नवं ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. ईडीच्या या पाहटेच्या धाडसत्रामुळे पुन्हा राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
फडणवीसांवर पुन्हा गंभीर आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ईडीच्या धाडीवरून राजकारण शिगेला पोहोचले आहे. महाविकास आघाडीचे नेते यावरून रोज भाजपवर आरोप करत आहे. मात्र आता सतीश उके यांचे वडील शेखर उके यांनीच असे गंभीर आरोप केल्याने पुन्हा राजकारणात खळबळ माजली आहे. सतीश उके हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील आहेत. त्यांनी अनेक केसेस फडणवीसांच्या विरोधातही लढवल्या आहेत. तसेच त्यांनी अनेकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकाही केली आहे. आणि त्याच वकीलाच्या घरी धाडी पडल्याने आता पुन्हा उलटसुलट राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. सतीश उके यांचे वडिल शेखर उके यांनी फक्त फडणवीस आणि ईडी यांच्यावरच आरोप नाही केले, तर महाविकास आघाडी सरकारलाही आवाहन केले आहे.
महाविकास आघाडीला हस्तक्षेप करण्याचे आवाहन
माझा मुलगा सतीश उके याच्यावर दोन ते तीन वेळा जीवघेणा हल्ला झालेला आहे. आज ईडी च्या अधिकाऱ्यांनी अतिशय चुकीची वागणूक आम्हाला दिलेली आहे. आमच्यावर त्यांनी दमदाटी सुद्धा केली. महाविकास आघाडी मी सरकारला आवाहन करत आहे की, या प्रकरणात त्यांनी लक्ष द्यावं. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सत्तेचा गैरवापर करत अनेक वेळा आमच्यावर खोटे गुन्हे देखील दाखल केले आहेत. त्यामुळे आम्हाला खूप त्रास झालेला आहे, असे आवाहन त्यांनी महाविकास आघाडीला केले तर फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.
Breaking News: कामावर रुजू न झालेल्यांवर उद्यापासून कारवाई! अनिल परब यांनी ठणकावलं, म्हणाले…