Nitin Gadkari : एकलव्य एकल विद्यालयाच्या अतिदुर्गम भागात एक हजारांवर शाळा, नितीन गडकरी म्हणाले, मानकर ट्रस्टचं काम मोठं

गडकरी म्हणाले, कोविड काळात मी व्हेंटिलेटर पाठवले. मात्र ते त्यांना चालविता येत नव्हते. आम्ही त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून ते शिकविलं. या भागात आता आम्ही वेगवेगळे प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न करत आहोत.

Nitin Gadkari : एकलव्य एकल विद्यालयाच्या अतिदुर्गम भागात एक हजारांवर शाळा, नितीन गडकरी म्हणाले, मानकर ट्रस्टचं काम मोठं
नितीन गडकरी म्हणाले, मानकर ट्रस्टचं काम मोठं
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 9:31 PM

नागपूर : एकलव्य एकल विद्यालयाच्या शिक्षक-प्रशिक्षक वर्गात केंद्रीय मंत्री (Union Minister) नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, एकल विद्यालयाच्या माध्यमातून अतिदुर्गम भागात 1000 च्या वर शाळा सुरू आहेत. या शाळांसाठी मानकर ट्रस्ट (Mankar Trust) मोठं काम करत आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळत आहे. या कार्यक्रमाला आलेले जयकुमार गुप्ता हे एकेकाळी मी बांधकाम मंत्री (Minister of Construction) असताना घाटकोपरचा पूल बांधायचा होता. त्यावेळी त्यांनी टेंडर भरलं. मात्र अधिकाऱ्यांनी त्यांना डिसक्वालिफाय केलं. ते मला म्हणाले, एक संधी द्या. चांगलं काम करून दाखवतो. त्यांनी आज देशांमध्ये मोठमोठी काम केली आहेत. संघात आम्ही एक गोष्ट शिकलो. ती म्हणजे जो शोषित आहे, गरीब आहे, त्यांची सेवा केली पाहिजे. त्याला ज्या दिवशी रोटी कपडा मकान मिळालं. तेव्हा आपलं काम सार्थकी लागलं असं समजायचं. या शाळेतील शिक्षक आणि पर्यवेक्षक एकच असतो. ते ज्या दुर्गम भागातून आले तिथे 15 ऑगस्ट 26 जानेवारीचा कार्यक्रम घेणे सुद्धा कठीण असतं, असे दुर्गम भाग आहे. या ठिकाणी सुविधा नाही. डॉक्टर आहे तर दवाखाना नाही. दवाखाना आहे तर डॉक्टर नाही, अशी परिस्थिती गडचिरोलीच्या दुर्गम भागात आहे.

दुर्गम भागात वेगवेगळे प्रयोग राबविण्याचा प्रयत्न

गडकरी म्हणाले, कोविड काळात मी व्हेंटिलेटर पाठवले. मात्र ते त्यांना चालविता येत नव्हते. आम्ही त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून ते शिकविलं. या भागात आता आम्ही वेगवेगळे प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न करत आहोत. जगात आणि देशात इंटरनेट सर्वत्र पोहोचलं. मात्र गडचिरोलीच्या दुर्गम भागात अजूनही ती सेवा नाही. सेवा उपलब्ध केली तर नक्षलवादी टावर तोडून टाकतात. आता आम्ही त्यासाठी सुद्धा काम करत आहोत.

वनसंपदेतून रोजगार निर्मिती

गडचिरोली भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांच्याजवळ असलेल्या वनसंपदेतून रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी बांधकाम मंत्री असताना अनेक रोड पूल बनविले. आता गडचिरोलीमध्ये पुलाचं काम सुरू आहे. त्या ठिकाणी मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. तिथल्याच युवकांना तिथे काम द्या आणि ते होत आहे, असंही गडकरी म्हणाले. ग्रीन हायड्रोजन बनविण्याची टेक्नॉलॉजी गडचिरोलीत पोहोचवायची आहे. आदिवासींची संस्कृती कायम ठेवून त्यांना उच्चशिक्षित केलं पाहिजे. लहानपणापासून या विद्यार्थ्यांवर संस्कार झाले पाहिजे. त्याने गडचिरोलीतील विद्यार्थी एक दिवस आपल्या पायावर उभा होईल. यांच्याकडे मोठ्या प्रमाणात झिंगे मिळतात ते जगात एक्सपोर्ट झाले पाहिजे. त्यातून यांना मोठा पैसा मिळेल त्यासाठी मी प्रयत्न सुरू केले, असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

एक दिन अंधेरा छटेगा

गडचिरोलीत आपल्याला युवकांची टीम बनवायची आहे. त्यांच्यात राष्ट्रभक्ती निर्माण करत त्यांना तंत्रज्ञानाशी जोडायचं आहे. राजकारणी कुठल्याही कार्यात पाच वर्षाचा विचार करतो. समाजकार्य करणारा मात्र शतकाचा विचार करतो तसं हे यांचं काम सुरू आहे. दुर्गम भागात काम करणाऱ्या ह्या लोकांपैकी इथे कोणी तिकीट मिळेल यासाठी काम करत नाही. तर समाजातील अंधार दूर करण्यासाठी काम करतो. मी एकदा अनेक वर्षांपूर्वी पार्टीच्या कार्यक्रमात गेलो तिथे अटलजींचे भाषण होतं. त्यांनी सांगितलं होतं एक दिन अंधेरा छटेगा. आज तो दिवस आला. मोदीजींच्या नेतृत्वात सरकार आली चांगलं काम होत आहे. अशाच प्रकारचं काम अति दुर्गम भागात करायचा आहे, असंही गडकरी म्हणाले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.