एकाच छताखाली शिंदे आणि ठाकरे गट मुक्कामाला? भरत गोगावले यांच्या ‘त्या’ विधानामुळे चर्चांना उधाण

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चा आहे ती नागपूरच्या अधिवेशनाची. या अधिवेशनाला महत्त्व प्राप्त होणाऱ्या अनेक गोष्टी आहेत.

एकाच छताखाली शिंदे आणि ठाकरे गट मुक्कामाला? भरत गोगावले यांच्या 'त्या' विधानामुळे चर्चांना उधाण
Follow us
| Updated on: Dec 19, 2022 | 9:00 PM

गिरीश गायकवाड, नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चा आहे ती नागपूरच्या अधिवेशनाची. या अधिवेशनाला महत्त्व प्राप्त होणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. त्यातील पहिली म्हणजे राज्यात सहा महिन्यांपूर्वीच शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करुन पक्षाचे 40 आमदार फोडत नवा गट निर्माण केला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने भाजपची साथ घेतली. त्यातून पुढे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं हे आपण सगळ्यांनी पाहिलं.

सहा महिन्यांपूर्वी स्थापन झालेलं सरकार आणि तब्बल दोन वर्षांनंतर नागपूरमध्ये होणारं हिवाळी अधिवेशन यामुळे या अधिवेशनाला महत्त्व प्राप्त आहेच. पण याशिवाय जास्त महत्त्वाची बाब म्हणजे या अधिवेशनाला असणारी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हजेरीची. विशेष म्हणजे त्याच पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडत असताना एक महत्त्वाची बातमी समोर आलीय.

उद्धव ठाकरे उद्या विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. अर्थात तशी चर्चा आहे. विशेष म्हणजे या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरच उद्धव ठाकरे आज नागपुरात दाखल झाले आहेत. नागपुरात ते रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये थांबले आहेत.

हे सुद्धा वाचा

विशेष म्हणजे याच रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये शिंदे गटाचे आमदार देखील थांबले आहेत. शिंदे गटाच्या एका आमदारानेच या वृत्ताला दुजोरा दिलाय. त्यामुळे शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे गटाचे आमदार एकाच छताखाली आज मुक्कामाल थांबणार असल्याच्या वृत्त खरं मानलं जातंय.

एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी याबाबत मोठं आणि महत्त्वाचं विधान केलंय. “ते आणि आम्ही एकाच हॉटेलमध्ये आहोत. आम्हाला माहीत नव्हतं की उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे हे याच हॉटेलला थांबतील”, असं भरत गोगावले म्हणाले.

“आम्ही त्यांना जाऊन भेटणार नाही, त्यांनीच आत्ता आम्हाला भेटावं. खरंतर हा निव्वळ योगायोग आहे”, असं भरत गोगावले यांनी स्पष्ट केलं.

…तर उद्या शिंदे-ठाकरे पहिल्यांदाच समोरासमोर येतील

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे राज्यात सत्तांतर झाल्यापासून समोरासमोर आलेले नाहीत. उद्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने कदाचित हे दोन्ही बडे नेते आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधान भवनात उद्या काय घडतं ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.