Nagpur मतदार नोंदणीसाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ, मनपा आयुक्तांचे नोंदणी करण्याचे आवाहन
बऱ्याचवेळा नागरिक, लोकप्रतिनिधी मतदानाच्या वेळी आपली नावे नसल्याबाबत तक्रारी करतात. यापेक्षा वेळीच अशा अभियानात सहभागी होणे देखील राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळं या देशाचे सजग नागरिक म्हणून या अभियानात प्रत्येकाने सहभागी व्हावे.
नागपूर : नवीन मतदार नोंदणीसाठी 5 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम-2022 अंतर्गत भारत निवडणूक आयोगानं ही संधी उपलब्ध करून दिलीय. या संधीचा लाभ घेऊन शहरातील 18 वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधावा
राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधींनी आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून या कार्यास सहकार्य करावे. मतदार यादीत वेळेवर नाव नसल्यास होणाऱ्या अडचणीला सामोरे जाण्यापेक्षा आताच मतदार यादीत नाव नोंदणी करा. मतदारांचे नाव मतदार यादीत नसल्यास तात्काळ नाव नोंदणी करून घ्यावी. तसेच इतरांना नाव नोंदणी करण्यास प्रोत्साहित करावे. छायाचित्र अथवा ठिकाण बदल व स्थनांतरामुळे ज्याचे नाव मतदार यादीतून चुकीने वगळले असतील, त्यांनी त्वरीत संबंधित बुथ लेवल ऑफिसर अथवा निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधावा.
स्थानांतरित नावे वगळू शकतात
बऱ्याचवेळा नागरिक, लोकप्रतिनिधी मतदानाच्या वेळी आपली नावे नसल्याबाबत तक्रारी करतात. यापेक्षा वेळीच अशा अभियानात सहभागी होणे देखील राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळं या देशाचे सजग नागरिक म्हणून या अभियानात प्रत्येकाने सहभागी व्हावे. सुशिक्षित युवकांनी आपल्या आजूबाजूच्या प्रत्येकाला मतदार झाले अथवा नाही. याबाबत विचारणा करून प्रशासनासोबत काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. 5 डिसेंबर, 2021 पर्यंत संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे मतदार फॉर्म क्रमांक 6 भरून नवीन नावे पुन्हा दाखल करू शकतात. फॉर्म नंबर 7 भरून यातील मयत, स्थानांतरित यांची नावे मतदार यादीतून वगळून शकतात. तसेच फॉर्म नंबर 8 भरून मतदार यादीतील लिंग, नाव, वय याबाबतच्या चुका दुरुस्त देखील होऊ शकतात.
ऑनलाईन फॉर्म भरता येईल
तसेच फॉर्म क्रमांक आठ अ भरून त्याच मतदारसंघातील एका भागातून दुसऱ्या भागामध्ये नावे स्थलांतरित केल्या जाऊ शकतात. तसेच एनव्हीएसपी डॉट इन या वेबसाईटवर मतदार ऑनलाईन देखील हे सर्व प्रकारचे फॉर्म भरू शकतात. भारत निवडणूक आयोगाचे वोटर हेल्पलाइन नावाचे मोबाईल ॲप तयार केलेले आहे. सदर ॲप डाऊनलोड करून त्यावरूनही सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरता येतात. तरी सर्व मतदार व नागरिकांनी व सर्व इच्छुक उमेदवारांनी सदर यादी तपासून आपल्या हरकती वेळेत नोंदवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.