राज्याचं नव्हे देशाचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करणार, या अपक्ष आमदारानं उधळली स्तुतीसुमने

भोंडेकर यांनी भाजपचा दुपट्टा वापरला होता. आमदार भोंडेकर फडणवीस यांच्या शेजारी मंचावर बसले होते.

राज्याचं नव्हे देशाचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करणार, या अपक्ष आमदारानं उधळली स्तुतीसुमने
या अपक्ष आमदाराची भविष्यवाणीImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Oct 03, 2022 | 3:28 PM

गजानन उमाटे, TV9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे अपक्ष निवडून आले. सध्या ते शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज भंडारा जिल्हा दौऱ्यावर होते. सकाळी भंडारा येथील लक्ष्मी सभागृहात भाजप कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले. या मेळाव्यात अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर हेही उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाजपचा दुपट्टा वापरला होता. आमदार भोंडेकर फडणवीस यांच्या शेजारी मंचावर बसले होते. त्यामुळं ते भाजपमध्ये प्रवेश करतात की, काय अशा चर्चा रंगल्या.

फक्त दुपट्टा घातला, भाजपात पक्षप्रवेश केला नाही

नरेंद्र भोंडेकर म्हणाले, भाजपच्या दुपट्ट्यापेक्षा भाजपच्या दुपट्यात भगवा होता. हा भगवा माझ्या खांद्यावर आधीपासून आहे. ते मित्रपक्षाचे आहेत. त्यामुळं मित्रपक्षाच्या सोबत मी राहायलाच पाहिजे. फडणवीस हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांचा निरोप होता. मला त्यांचा आदेश पाळावा लागला.

फडणवीस मला म्हणाले, नरेंद्र भोंडेकर हे आपले आहेत. भाजपचा दुपट्टा मी भगवा म्हणून वापरला आहे. आम्ही अजून युतीमध्ये आहोत. भाजपात पक्षप्रवेश केला नाही. फडणवीस यांची इच्छा होती की, मी भाजपचा दुपट्टा घालावा म्हणून मी घातला, असं भोंडेकर यांनी सांगितलं.

फडणवीसांच्या राजकीय कामाने सर्व आमदार प्रभावित

देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे. ते देशाचे नेते होऊ शकतात. फडणवीस यांच्या राजकीय कामाचा सगळ्यांवर प्रभाव आहे. सर्वचं आमदार त्यांना रिस्पेक्ट देतात. त्यांच्याकडून शिकण्यासारखं असते ते गुरुचं असतात.

फडणवीसांबाबत भोंडेकर म्हणाले, भविष्यातले देशाचे नेते हे देवेंद्र फडणवीस आहेत. राज्यंच नाही तर भविष्यात देशाचं नेतृत्व फडणवीस करणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भंडारा – गोंदिया खासदार सुनील मेढे यांच्या कार्यअहवालाचं फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा आणि भाजप मेळावा घेण्यात आला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.