शेतकऱ्यांनी इतक्यात पेरणी करु नये, अतिवृष्टीमुळे बियाणं वाया जाईल; कृषी विभागाचा सल्ला
राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरणीसाठी तयारी सुरु केली होती. मात्र, हवामान खात्याने नागपुरात 12 जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. | Heavy Rain Farmers
नागपूर: यंदा राज्यात मान्सूनचा हंगाम दणक्यात सुरु झाला असली तरी शेतकऱ्यांनी इतक्यात पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. आगामी काही दिवसांमध्ये राज्यात अतिवृष्टीची (Heavy Rain) शक्यता आहे. त्यामुळे घाईघाईने बियाणे पेरल्यास ते वाया जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी काही काळ धीर धरावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. (Heavy Rain expected in Nagpur farmers should wait for sowing activity)
राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरणीसाठी तयारी सुरु केली होती. मात्र, हवामान खात्याने नागपुरात जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तोपर्यंत बियाणांची पेरणी करु नये, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
Bhendwal Bhavishyavani : पाऊस भरपूर पण पीक साधारण, राजा कायम पण ताण वाढेल, भेंडवळची भविष्यवाणी
हवामान खात्याने मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या चार-पाच दिवसांत अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तविला आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर या परिसरात शनिवारी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबच्या पट्टा तयार झाल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर त्याचा परिणाम पाहायला मिळेल. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसांत किनारपट्टीलगत असणाऱ्या भागांमध्ये जोरदार पाऊस पडेल. त्यादृष्टीने मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्गात ढगफुटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुढचे तीन तास धोक्याचे !
मुंबई , रायगड , ठाणे , पालघर जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 30 ते 40 किलोमीटर वादळी वाऱ्यासह मध्यम ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिकांना झाडाखाली उभे राहू नये. तसेच बाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने जूहू चौपाटीवर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ढगांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली असून समुद्रात मोठ्या लाटा उसळत आहेत.
संबंधित बातम्या:
Weather Alert: मुंबई आणि कोकणात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; हवामान खात्याचा रेड अलर्ट
दाणादाण! मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग; सखल भागात पाणी भरले, रस्तेही पाण्याखाली!
(Heavy Rain expected in Nagpur farmers should wait for sowing activity)