Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Kedar | त्वरा करा, शेतकऱ्यांसाठी पन्नास टक्के अनुदान; पशुसंवर्धन विभागाच्या योजना जाणून घ्या…

शेतीपुरक व्यवसाय करण्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. सरकारने शेतीवर आधारित पुरक व्यवसायासाठी पन्नास टक्के अनुदान जाहीर केले आहे. राष्ट्रीय पशुसंवर्धन अभियान असे नाव याला दिले आहे. जाणून घ्या काय आहेत सरकारच्या या योजना...

Sunil Kedar | त्वरा करा, शेतकऱ्यांसाठी पन्नास टक्के अनुदान; पशुसंवर्धन विभागाच्या योजना जाणून घ्या...
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 6:13 AM

नागपूर : पशुसंवर्धन विभागाद्वारे (Animal Husbandry Department) उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारित नवीन सुधारित राष्ट्रीय पशुसंवर्धन अभियान योजना 2021-22 या वर्षापासून राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ व्यक्तिगत व्यावसायिक, स्वयंसहाय्यता बचतगट, शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी जोखीम गट (जेएलजी) सहकारी संस्था, खाजगी संस्था, स्टार्टअप ग्रुप इत्यादी घेऊ शकतात. योजनेंतर्गत शेळी, मेंढी पालन, कुक्कुट पालन, वराह पालन, पशुखाद्य व वैरण विकास उपअभियाना अंतर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर, फॉडर ब्लॉक निर्मिती तसेच वैरण बियाणे उत्पादन या योजनांकरिता 50 टक्के अनुदान (subsidy for farmers) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अनुदानाची अधिकतम मर्यादा शेळी-मेंढी पालन–50 लाख रुपये, कुक्कुट पालन – 25 लाख रुपये, वराह पालन –30 लाख रुपये आणि पशुखाद्य व वैरण विकासासाठी 50 लाख रुपये इतकी आहे. प्रकल्पासाठी स्वहिस्सा व्यतिरिक्त उर्वरित आवश्यक निधी बँकेकडून कर्जाद्वारे उपलब्ध करून घ्यावयाचा आहे.

अर्जाचा नमुना कोठे मिळेल?

योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. अर्ज सादर करताना सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर), पॅन कार्ड, आधार कार्ड, रहिवासी पुरावा (मतदान ओळखपत्र, वीज देयकाची प्रत) छायाचित्र, बँकेचा रद्द केलेला चेक आदी सादर करणे (अपलोड) अनिवार्य आहे. अनुभवाचे प्रमाणपत्र, वार्षिक लेखामेळ, आयकर रिटर्न, प्रशिक्षण प्रमाणपत्र, जमिनीचे कागदपत्र, जीएसटी नोंदणी आदी उपलब्ध असल्यास सादर करावे. सदर योजनेच्या सर्व मार्गदर्शक सूचना, वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न, अर्जाचा नमुना राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळ http://ahd.maharashtra.gov.in व केंद्र शासनाच्या संकेतस्थळ http://www.nlm.udyamimitra.in यावर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

डीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती, परीक्षा फीच्या योजनेचा लाभ

महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी आदी सवलतींचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नूतनीकरण करण्यास 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचबरोबर 2020-21 या वर्षात अर्ज केलेले मात्र त्रृटी असलेल्या विद्यार्थ्यांना देखील त्रृटींची पूर्तता किंवा अर्जात दुरुस्ती करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील सुमारे 4.70 लाख विद्यार्थी दरवर्षी डीबीटी पोर्टलवरुन वरील सवलतींचा लाभ घेत असतात. यावर्षी यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नूतनीकरण करण्यास 12 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. काही कोर्सेसचे सीईटीचे राऊंड अजूनही सुरु आहेत. त्यामुळे आतापर्यंत 1.16 लाख विद्यार्थीच डीबीटी पोर्टलवर अर्ज करु शकले आहेत. त्यामुळे पात्र असलेले लाभार्थी शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी आदी लाभांपासून वंचित राहू नयेत यासाठी डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास तसेच मागील वर्षीच्या अर्जाचे नूतनीकरण करण्यास 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी दिली आहे.

Nagpur Crime | प्रेयसीसाठी चोर बनलेला पोलिसांना धक्का मारून पळाला; जंगलात कसे केले सर्च ऑपरेशन?

Nagpur RTO | वाहन नोंदणी व नूतनीकरणाचे नवीन दर 1 एप्रिल लागू होणार, जाणून घ्या नवे दर

Nagpur School | सरसकट शाळाबंदीच्या निर्णयाला विरोध, शिक्षणाची जिम्मेदारी घेणार कोण ?, प्रा. सचिन काळबांडे म्हणतात…

'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.