Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : Nagpur Fire | नागपुरातील गोरेवाडा जंगलाला आग; तीन गाड्यांच्या मदतीनं आग नियंत्रणात

आगीच्या घटनेची माहिती होताच अग्निशमन दल व वनविभागाच्या चमूनं याची दखल घेतली. दुपारची वेळ असल्यानं ही आग पसरत होती. पण, अग्निशमन विभागाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. कर्मचारी नेटानं कामाला लागले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं ही आग नियंत्रणात आणली.

Video : Nagpur Fire | नागपुरातील गोरेवाडा जंगलाला आग; तीन गाड्यांच्या मदतीनं आग नियंत्रणात
नागपुरातील गोरेवाडा जंगलाला आगImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 5:55 PM

नागपूर : नागपूरच्या गोरेवाडा जंगलाला (Forest) आग लागली. या आगीचा वणवा मोठा होता. त्यामुळं जंगलाचं बरचं नुकसान झालं. वाळलेला पालापाचोळा तसेच लाकडं जळून खाक झालीत. ही आग कशी लागली हे कळू शकलं नाही. पण, या आगीवर नियंत्रण आणण्यात अग्निशमन दल आणि वन विभागाला (Forest Department) यश आलंय. आग पसरण्यापासून रोखण्यात आलं आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण आणण्यात आलंय. जंगलातील वाळलेलं गवत (Dried grass) आणि पाला पाचोळा असल्याने आग पसरत होती. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग नियंत्रणात आणली. आगीच कारण अद्याप स्पष्ट नाही.

पाहा व्हिडीओ

जंगलातील आगीवर नियंत्रण

आगीच्या घटनेची माहिती होताच अग्निशमन दल व वनविभागाच्या चमूनं याची दखल घेतली. दुपारची वेळ असल्यानं ही आग पसरत होती. पण, अग्निशमन विभागाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. कर्मचारी नेटानं कामाला लागले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं ही आग नियंत्रणात आणली.

आगीचा वणवा पेटला

आग कशी लागली. याची माहिती मिळू शकली नाही. एखाद्यानं पेटती सिगारेट फेकली, तरी आग फडकू शकते. उन्हाचे दिवस असल्यानं आग पसरते. त्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यापूर्वी अशीच एक घटना सालेबर्डीच्या जंगलात घडली होती. त्या जंगलाला आग लागल्यामुळं मोठं नुकसान झालं होतं. गेल्या पंधरा दिवसातील ही नागपुरातील जंगलाला लागलेली दुसरी मोठी आगीची घटना आहे.

चंद्रपुरातही आगीची घटना

दोन दिवसांपूर्वीच चंद्रपूरच्या जंगलात आग लागली होती. त्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. वनविभागाचं आग नियंत्रण पथक कार्यरत असतं. ते आगीवर नियंत्रण करण्याचं काम करते. तरीही आगीच्या घटना या उन्हाळ्यात घडत असतात. आग नियंत्रण करणारी यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे.

'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट.
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं.
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका.
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला.
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया.