VIDEO | Bhandara Fire | भंडाऱ्यातील तुमसरमध्ये किराणा दुकानाला भीषण आग, 15 लाखांचे साहित्य जळून खाक
भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात असेलल्या (Bhandara) हरिओम ट्रेडर्स या किराणा दुकानाला गुरुवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास भीषण आग लागली. दुकानातून धूर निघत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात येताच अग्नि शामक दलाला याची माहिती देण्यात आली होती. मात्र, आग इतकी भीषण होती की आग आटोक्यात येत नव्हती.
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात असेलल्या (Bhandara) हरिओम ट्रेडर्स या किराणा दुकानाला गुरुवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास भीषण आग लागली. दुकानातून धूर निघत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात येताच अग्नि शामक दलाला याची माहिती देण्यात आली होती. मात्र, आग इतकी भीषण होती की आग आटोक्यात येत नव्हती. त्यामुळे तिरोडा येथून अग्नि शामक दलाला पाचारण करण्यात आले. अखेर चार तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आग विझविण्यात अग्नि शामक दलाच्या जवानांना यश आले. मात्र तोपर्यंत संपूर्ण दुकान जळून खाक झाले होते. या आगीत जवळपास 15 लाखाचे किराणा साहित्य स्वाहा झाले आहे (Fire Broke Out At A Grocery Store In Tumsar Bhandara).
हे किराणा दुकान शहराच्या मध्यभागी आहे. ही आग इतकी भीषण होती की जवळच्या घरांना देखील आपल्या कवेत घेऊ शकत होती. मात्र वेळीच सावधगी बाळगल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.
Breaking : उरवडे आगी दुर्घटनेस कंपनी मालक जबाबदार, पौड पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा https://t.co/MRzp1mxHgZ @AjitPawarSpeaks @Dwalsepatil @supriya_sule @PuneCityPolice @puneruralpolice #PuneFire #UrawadeVillage #ChemicalCompanyFire #punePolice
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 8, 2021
संबंधित बातम्या :
नागपुरात एलपीजी सिलेंडरमधील गॅस लिक, आगीत तीन घरं जळून खाक
उरवडे आग प्रकरणातील दोषींवर कारवाई होणार, मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी
Pune Fire | मुळशीच्या कारखान्यातील आग पुन्हा भडकली, गोदामातील साहित्याने घेतला पेट