Nagpur Crime | आधी शरीरसंबंधात बाध्य करायचं नंतर खंडणी उकळायचं, नागपुरातील बबली-बंटी पोलिसांच्या जाळ्यात

नागपूर आणि नजिकच्या परिसरात आपलं सावज हेरायचं. त्यांच्याशी लग्न करुन घरच्यांना लुटणाऱ्या एका लुटारी महिलेला जरीपटका पोलिसांनी अटक केली आहे. मेघाली तिजारे असं आरोपी महिलेचं नाव आहे. तिचा खरा बॉयफ्रेंड मयूर मोटघरेलादेखील पोलिसांनी अटक केली आहे.

Nagpur Crime | आधी शरीरसंबंधात बाध्य करायचं नंतर खंडणी उकळायचं, नागपुरातील बबली-बंटी पोलिसांच्या जाळ्यात
नागपुरातील बबली-बंटी पोलिसांच्या जाळ्यात Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 5:49 PM

नागपूर : काही दिवसांपूर्वी मेघालीने नागपूरच्या कळमना मार्केट (Kalmana Market) भागातील भाजी विक्रेता महेंद्र मनवानीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. यानंतर मेघालीने महेंद्रला आपल्यासोबत दुष्कर्म केल्याची धमकी देत त्याच्यासोबत लग्न केलं. महेंद्रने दबावाखाली येऊन मेघालीसोबत लग्न (Married to Meghali) केलं. त्यानंतर तिने काही काळातच हुंड्यासाठी मारहाण, अनैसर्गिक कृत्य, मारपीट करणं यासारख्या गुन्ह्यांमध्ये महेंद्र आणि तिच्या परिवाराविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणात महेंद्रला तुरुंगवास (Mahendra imprisoned) झाल्यानंतर मेघालीने त्याची जेलमध्ये जाऊन भेट घेतली. त्याच्याकडे 4 लाखांची मागणी केली. यानंतर महेंद्रने आपल्या वडिलांना सांगून मेघालीला 2 लाख 10 हजार रुपये द्यायला सांगितले.

नवऱ्यालाच दिली खुनाची धमकी

जेलमधून बाहेर आल्यानंतर महेंद्रने जरीपटका पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना आपल्यावर आलेली आपबिती सांगितली. त्यानंतर जरीपटका पोलीस ठाण्याने चौकशी करत मेघाली आणि तिचा बॉयफ्रेंड मयूरला अटक केली आहे. तपासाअंती मेघाली आणि मयूरनेही लग्न केल्याचं निष्पन्न झालं आहे. अशी माहिती जरीपटक्याचे पोलीस निरीक्षक संतोष बकल यांनी दिली. पोलिसांनी महेंद्रला अटक करून कारागृहात डांबले. त्यानंतर मेघाली अधिकच आक्रमक झाली. जमानत होऊ देणार नाही. तुझा खून करेन, अशी धमकी दिल्याचंही महेंद्रनं सांगितलं. या महिलेने आणखी कोणाला फसविले आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत.

अनेकांना हनी ट्रपमध्ये अडकवले

नागपूर आणि नजिकच्या परिसरात आपलं सावज हेरायचं. त्यांच्याशी लग्न करुन घरच्यांना लुटणाऱ्या एका लुटारी महिलेला जरीपटका पोलिसांनी अटक केली आहे. मेघाली तिजारे अस आरोपी महिलेचं नाव आहे. तिचा खरा बॉयफ्रेंड मयूर मोटघरेलादेखील पोलिसांनी अटक केली आहे. मेघालीनं आतापर्यंत वर्धा आणि एमआयडीसी उद्योजकांसह अनेकांनी हनीट्रपमध्ये अडकवल्याची माहिती आहे. जे अडकले नाही त्यांच्याविरोधात तिने बलात्कार केल्याची तक्रार केली आहे.

हे सुद्धा वाचा

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.