तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिव्हीर मुबलक प्रमाणात उपलब्ध, कंपन्यांशी चर्चा सुरु, राजेंद्र शिंगणेंची माहिती
अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
नागपूर: अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात ऑक्सजिन व रेमडीसिव्हीर वर लक्ष केंद्रित केले होते. तिसरी लाट जर आली तर, रेमडेसिव्हीर तीन चार पट उपलब्ध आहे, अशी माहिती राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.
आम्ही औषध कंपन्यांच्या संपर्कात आहोत. प्रोडक्शन वाढवले पाहिजे, कच्च्या मालाची अडचण येत असेल तर कंपन्यांनी माहिती द्यावी, शासन मदत करणार असल्याचं राजेंद्र शिंगणे म्हणाले आहेत. राज्याची ऑक्सजिनची उपलब्ध क्षमता साडे बाराशे ते तेराशे टन होती. केंद्र सरकारने पाचशे टन पर्यंत मदत केली होती. आपण 1800 मेट्रिक टन पर्यंत पोहचलो असून, आता तीनपट ऑक्सिजन तयारी केंद्राच्या सुचने प्रमाणे केली आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.
ऑक्सिजनचे नवे प्लांट तयार करण्याचं काम सुरु
उद्योग विभागच्या माध्यमातून ऑक्सिजनचे नवे प्लांट तयार करण्याचे काम सुरू आहे. राज्य सरकार तयारीला लागले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळेला जे रुग्ण आयसीयूमध्ये दाखल होते, ज्यांना ऑक्सिजन लागले होते आणि ज्यांना इतर आजार होते अशांना म्युकर मायकोसिस सारख्या आजारांचा त्रास झाला. तेव्हा एम्फोटेरेसिन इंजेक्शनची ही कमतरता होती आता त्याबद्दल ही तयारी करत आहोत. डॉक्टर्सनी त्या संदर्भात वेगवेगळे निष्कर्ष पुढे केले आहेत.
नागपूर आणि अमरावतीचा आढावा
अन्न व औषध प्रशासन मंत्री माननीय राजेंद्र शिंगणे यांनी आज नागपूर आणि अमरावती विभागाचा आढावा घेतला. सणासुदीच्या काळात भेसळ होणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच कोरोना काळात ऑक्सिजन कमी पडणार नाही याबाबतचे नियोजन करावे अशा सूचना त्यांनी केल्या.
नागपूरमधील 12 पोलिसांना कोरोना
नागपूरमधील एमबीबीबएसचे विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं प्रकरण ताजं असताना 12 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं नागपूरमध्ये खळबळ माजली आहे. पुणे येथे ट्रेनिंग साठी गेलेल्या 12 पोलीस कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नागपूर पोलीस दलाची चिंता वाढली आहे.
30 ऑगस्टला नागपूर पोलीस दलातील सर्व 31 पोलीस स्टेशन मधील गुप्त वार्ता विभागातील प्रत्येकी एक पोलीस कर्मचारी व विशेष शाखेतील 2 असे एकूण 33 पोलीस कर्मचारी पुणे येथील महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमी येथे 10 दिवसांच्या ट्रेनिंग साठी गेले होते. ट्रेनिंग आटोपून नागपुरात परत आल्यावर एका पोलीस कर्मचाऱ्याला ताप व खोकला सारखी सौम्य लक्षणे जाणवल्याने पोलीस रुग्णालयातही डॉक्टरांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना टेस्ट करण्याची सूचना दिली असता त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.
इतर बातम्या:
Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या 30 हजारांच्या खाली, कोरोनाबळींतही घट
कोयना धरणाच्या सहा दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरु होणार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
सरकारचा मोठा निर्णय, बेरोजगारांना पुढच्या वर्षापर्यंत मिळणार ‘या’ योजनेचा लाभ
हेही पाहा:
Food and Drug Administration Minister Rajendra Shingane said we have prepared for medicine and oxygen facility for corona third wave said at Nagpur