AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yavatmal shooting case | उमरखेड येथील डॉक्टरांवरील गोळीबार प्रकरणी चार आरोपी जेरबंद; दहा पथकांनी कशी केली कारवाई?

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील वैद्यकीय अधिकाऱ्यावर अकरा जानेवारीला गोळीबार करण्यात आला. यात डॉ. हनुमंत धर्माकारे यांचा मृत्यू झाला. चोवीस तासांत पोलिसांनी दहा पथके तयार करून चार आरोपींना अटक केली. पण, मुख्य आरोपी पसार झालाय. या खुनाचे रहस्य या चार आरोपींनी उलगडले आहे.

Yavatmal shooting case | उमरखेड येथील डॉक्टरांवरील गोळीबार प्रकरणी चार आरोपी जेरबंद; दहा पथकांनी कशी केली कारवाई?
उमरखेडच्या गोळीबार करून डॉक्टरांच्या हत्या प्रकरणाची माहिती देताना यवतमाळचे पोलीस.
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 6:53 PM

यवतमाळ : उमरखेड येथील आर. पी. उत्तरवार कुटीर रुग्णलयात डॉ. हनुमंत संताराम धर्माकारे (Dr. Hanumant Dharmakare) हे वैद्यकीय अधिकारी होते. अकरा जानेवारी रोजी अज्ञात व्यक्तीने उमरेड-पुसद रोडवरील साखळी महाविद्यालयासमोर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. तपासासाठी पोलीस अधीक्षकांनी दहा पथके तयार केली. यात सायबर सेलच्या पथकांचा समावेश होता. जिल्ह्यातील सर्व सीमा सील करण्यात आल्या. डॉ. धर्माकारे यांच्या कौटुंबिक व आर्थिक वादाची पडताळणी करण्यात आली. उमरखेड शहरातून बाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. जिल्ह्यातील सराईत गुन्हेदार तपासण्याचे आदेश देण्यात आले.

ऐफाज शेखने दिली होती जिवे मारण्याची धमकी

डॉ. धर्माकारे हे चार मे 2019 रोजी शासकीय रुग्णालय उमरखेड येथे कर्तव्यावर होते. तेव्हा अपघातात अरबाज शेख यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. डॉ. धर्माकार यांच्या हलगर्जीपणाने हा मृत्यू झाल्याचा आरोप ऐफाज शेख व त्याच्या नातेवाईकांनी केला होता. तसेच डॉक्टरांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. ऐफाज हा मृतक अरबाजचा लहान भाऊ होता.

चार जणांना अटक, मुख्य आरोपी पसार

सीसीटीव्ही फुटेजमध्ये ऐफाज शेखसारख्या (वय 22) शरीरयष्टीचा व्यक्ती दिसला. त्याने चेहऱ्यावर पट्टी बांधली होती. त्यामुळं पोलिसांचा संशय आणखी बळावला. ऐफाज व त्याचा मामा ढाकणी येथील सय्यद तौसिफ (वय 35) व त्याच्या मित्रांनी गोळ्या झाडल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली. याप्रकरणी सय्यद तौसिफ, सय्यत मुस्ताक, (वय 32), शेख मौहसिन (वय 34) यांना ताब्यात घेण्यात आले. ऐफाजने गोळ्या झाडून ढाकणी येथून पसार झाला. डॉक्टरांवर गोळ्या झाडून त्याने आपल्या भावाचा बदला घेतला. या प्रकरणी सय्यद तौसिफ, सय्यत मुस्ताक, शेख मौहसिन व शेख शाहरूख या आरोपींना पोलिसांनी अटक केली. मुख्य आरोपी फरार झाला. त्याचा शोध घेण्यासाठी दहा पथके कामाला लागली आहेत.

पोलिसांना एक लाखाचे बक्षीस

पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक के. ए. धरणे, उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी, प्रदीप परदेशी, अमोल माळवे, अमोल पुरी यांनी चोवीस तासांत आरोपीला शोधून अटक केली. याबद्दल या टीमला प्रोत्साहन म्हणून एक लाख रुपयांचे पारितोषिक पोलीस अधीक्षकांनी जाहीर केले आहे. पोलिसांनी एकूण 15 पैलूवर तपास या प्रकरणी केला होता अशी माहिती अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांनी दिली.

ओबीसी आरक्षणाबाबत सोमवारी न्यायालयात सुनावणी; वडेट्टीवार म्हणतात, वेळ वाढवून देण्याची मागणी करणार, कारण काय?

Nagpur Crime | एफआयआर दाखल करणार नाही म्हणून मागितली लाच; रामटेकचा वनपाल कसा अडकला एसीबीच्या जाळ्यात?

Nagpur Corona | नागपुरात कोरोनाचे तीन बळी, चिंता वाढली; बाधितांमध्ये पोलिसांची संख्या किती?

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.