8 मित्र तलावावर सहलीसाठी गेले, सेल्फीच्या नादात चौघांचा झाला घात

एकाने स्वतःची सेल्फी काढली. तेवढ्यात तो तलावात घसरला. मित्र त्याला वाचवण्यासाठी तलावात गेले. पण, तेही परत आले नाही.

8 मित्र तलावावर सहलीसाठी गेले, सेल्फीच्या नादात चौघांचा झाला घात
Follow us
| Updated on: Jul 16, 2023 | 8:19 PM

चंद्रपूर : घोडाझरी तलाव हे पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. पावसाळा सुरू असल्याने या तलावात पाणी आहे. ते पाहण्यासाठी युवक या तलावावर येत असतात. पण, या तलावातील पाणी आपल्या जीवावर बेतेल, असं त्यांना कधी वाटलं नसेल. आठ मित्र सहलीसाठी म्हणून घोडाझरी तलावावर आले. ते मौजमस्ती करत होते. तेवढ्यात तलावाच्या काठावर त्यांनी सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. एकाने स्वतःची सेल्फी काढली. तेवढ्यात तो तलावात घसरला. मित्र त्याला वाचवण्यासाठी तलावात गेले. पण, तेही परत आले नाही.

चार युवकांचा बुडून मृत्यू

सेल्फी काढण्याच्या नादात 4 युवकांचा बुडून मृत्यू झालाय. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातल्या घोडाझरी सिंचन तलावावर घडली. वरोरा तालुक्यातील शेगाव येथील 8 युवक वर्षा सहलीसाठी घोडाझरी तलावावर पोचले होते. यातील एक युवक सेल्फी काढण्याच्या नादात तलावात घसरला. त्याला वाचविण्याच्या नादात पाण्यात उतरलेल्या अन्य 3 युवकांना देखील जलसमाधी मिळाली.

मृतदेहांचे शोधकार्य सुरू

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्ती निवारण पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या स्थानिक मासेमारांच्या मदतीने मृतदेहांचे शोधकार्य सुरू आहे. जिल्हास्थानाहून अधिक बचाव कुमक शोधकार्यासाठी रवाना केली जात आहे.

बुडालेल्या मुलांची नावे

मनीष श्रीरामे (वय २६), धीरज झाडे (वय २७), संकेत मोडक (वय २५) आणि चेतन मांदाडे (वय १७ ) अशी बुडालेल्यांची नावे आहेत.

नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

मागील 24 तासांपासून गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं गोसीखुर्द धरणातून दुपारी 12 वाजता 23 गेट मधून 89 हजार 427 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र, धरणाच्या पाण्याच्या पातळीत झपाट्यानं वाढ झाल्यानं पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरण प्रशासनानं धरणाचे आणखी चार गेट उघडले. एकूण 27 गेट मधून 1 लाख 4 हजार 272 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. प्रशासनानं नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.