Nagpur Corona | नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे चार बळी; अडीच हजारांच्या उंबरठ्यावर बाधित

नागपूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे चार बळी गेले. अडीच हजारांच्या उंबरठ्यावर बाधित रुग्ण सापडलेत. विशेष म्हणजे टेस्ट करणारा चौथा व्यक्ती बाधित सापडला. जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या बारा हजारांवर गेली आहे.

Nagpur Corona | नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे चार बळी; अडीच हजारांच्या उंबरठ्यावर बाधित
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 10:02 AM

नागपूर : जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा वेग वाढत आहे. आता मृत्यूची नोंद दर दिवसाला होत आहे. मागील 24 तासांत 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू (victims of corona ) झाला. हे सर्वजण शहरातील आहेत. यामुळे आरोग्य प्रशासन आता पुरते हादरले आहे. तर नव्याने दोन हजार 451 जणांना कोरोनाने विळख्यात घेतले. जिल्हात सक्रिय कोरोनाबाधितांची (active patient) संख्या 12 हजार 645 झाली आहे. विशेष असे की, 7 दिवसांमध्ये 13 जण दगावले आहेत. यामुळे नागपूरकरांच्या चिंतेत भर पडली. तिसऱ्या लाटेत ओमिक्रॉनच्या संक्रमणाचा वेग वाढणार असल्याचे वर्तविण्यात आले. मात्र कोरोना संक्रमणाची गती प्रचंड वाढली आहे. चोवीस तासांत शहरात एक हजार 961 तर ग्रामीण भागात 408, जिल्ह्याबाहेरील 82 अशा एकूण जिल्ह्यात 2 हजार 451 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल शहरातील प्रयोगशाळांमधून पुढे आला.

8 हजार 690 संशयितांच्या चाचण्या

आतापर्यंत शहरातील कोरोनाबाधितांची एकूण ५ लाख 11 हजार 523 झाली आहे. महिनाभरापूर्वी दिवसभरात दोन हजार चाचणी होत होत्या. परंतु कोरोना चाचण्यांची गती प्रशासनाने वाढवली. दिवसभरात जिल्ह्यात 8 हजार 690 संशयितांनी चाचण्या केल्या. चाचण्या वाढल्या तशी बाधितांची संख्या वाढली असल्याचे चित्र दिसून आले.

आरोग्य विभागाची चिंता वाढली

जिल्ह्यात तिसरी लाट जानेवारीदरम्यान सुरू झाली. मात्र 1 जानेवारी 2022 रोजी एकाचा कोरोनाने मृत्यू झाला होता. मात्र हा रुग्ण जिल्ह्याबाहेरून उपचाराला आला होता. त्यानंतर 11 जानेवारीला एका शहरातील रुग्ण दगावला. 13 जानेवारीला 1, 14 जानेवारीला 3, 15 जानेवारीला 1, 16 जानेवारीला 3 कोरोनाबाधित दगावले. यामुळे आतापर्यंत कोरोनाची मृत्यूसंख्या 10 हजार 136 वर पोहचली आहे. मृत्यू वाढत असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

कोरोनामुक्तांची संख्या वाढली

सोमवारी जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा वाढला. शहरात दिवसभरात 989, ग्रामीणला 80 जणांनी कोरोनावर मात केली. सक्रिय रुग्णांपैकी नऊ हजार 617 रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. तर उर्वरित तीन हजार 28 रुग्ण विविध शासकीयसह खासगी रुग्णालयात व संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

Accident | रुग्णावर उपचार करून परतत होते नागपूरला, विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकच्या धडकेत टवेरातील चार ठार

Nagpur suicide | थडीपवनीतील शेतकऱ्याची आत्महत्या; का घ्यावी लागली विहिरीत उडी?

PHOTO: वाघिणीचा जेव्हा अंत होतो.. पेंच अभयारण्यातली 29 बछड्यांची आई दगावली, वन्यप्रेमी हळहळले!

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.