नागपूर : अजनी पोलिसांत युवा सेनेच्या नेत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत युवा सेनेचा प्रदेश महासचिव विशाल केचे यानं सेनेत प्रवेश केला होता. बनावट कागदपत्रांवरून प्लाट खरेदी प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
बनावट कागदपत्रांच्या आधारे एका प्लाटची दोघांना विक्री करण्यात आली होती. याप्रकरणी अमरावतीचा विशाल केचे, अमरनगरचा मंगेश सेंगर, शोभा काळे, लक्ष्मी चापके, बजरंगनगरचा पुरुषोत्तम काळे यांच्याविरोधात अजनी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रशांत जवने यांनी याप्रकरणी तक्रार केली होती.
विशाल केचे मूळचा अमरावतीचा असला तरी गेल्या काही दिवसांपासून तो नागपूर शहरात सक्रिय झाला आहे. युवा सेनेत प्रादेशिक सचिव झाला आहे. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यावर आधीच गुन्हे दाखल आहेत. या प्रकारामुळं युवा सेनेचे वातावरण गरम आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यानं युवा सेनेत प्रवेश केला होता.
न्यू बाबुलखेडा येथील प्रशांत जवने यांनी बेसा येथे वंदना चाचेरकर यांच्याकडून 25 लाखांत दोन प्लाट खरेदी केले होते. याप्रकरणी प्रशांत जवने यांनी तक्रार केली आहे. त्यानुसार, १५ ऑक्टोबर २०२० ला प्लाटवर सफाई करत असताना मंगेश सेंगर आणि विशाल केचे तिथं आले. त्यांनी शोभा काळे यांना संबंधित प्लाट १६ सप्टेंबर २०२० रोजी विक्री केल्याची माहिती दिली. प्रशांतनं अधिक माहिती घेतली असता तो प्लाट शोभा काळे यांनी ताजकृपा गृहनिर्माण सोसायटीकडून खरेदी केल्याचे समजले. शोभा काळे यांनी तो प्लाट १९११ मध्ये ईश्नर चिनोरे यांना विकला होता. प्रशांतनं चिनोरे यांच्या नातेवाईकांकडून तो प्लाट खरेदी केला होता. परंतु, आरोपींनी खोटी कागदपत्र तयार केल्याची माहिती प्रशांत यांना झाली. त्यावरून त्यांनी अजनी पोलिसांत तक्रार दाखल केली. सत्ताधारी राजकीय पक्षात प्रवेश करण्यामागचा काही उद्देश होता, असा प्रश्न आता विचारला जात आहे. राजकीय पक्षात प्रवेश करायचा आणि राजकीय दबावापोटी आपले गुन्हे दाबून ठेवायचे, असा प्रयत्न तर या आरोपींचा नव्हता ना, असा प्रश्न निर्माण होत आहे.
इतर बातम्या
भाजप नेते छोटू भोयर यांनी का सोडला पक्ष?, पक्षात मोठी खदखद असल्याचा आरोप
भावी मास्तरांची दमछाक, एसटी बंदचा फटका, खासगी वाहनांनी केली लूट