Nagpur School | आजपासून पहिली ते नववीच्या शाळा सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत; जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांचे आदेश
नागपूर जिल्ह्यातील वर्ग एक ते नववीपर्यंत तसेच अकरावीच्या शाळा एक एप्रिलपासून सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत भरतील. अशाप्रकारचे आदेश जिल्हाधिकारी तसेच मनपा आयुक्त यांनी दिले आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
नागपूर : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच शहराचे तापमान (Temperature) वाढायला सुरुवात होते. त्यामुळे शाळा दिवसभर सुरु ठेवणे शक्य नाही. शासनाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शुक्रवार एक एप्रिलपासून नागपूर महापालिका क्षेत्रातील सर्व शाळातील इयत्ता पहिली ते नववी व इयत्ता अकरावी चे वर्ग सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश मनपा आयुक्त (Municipal Commissioner) राधाकृष्णन बी. यांनी जारी केले. जिल्ह्यातील वर्ग एक ते नववीपर्यंत तसेच अकरावीच्या शाळा सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत भरतील. अशाप्रकारचे आदेश जिल्हाधिकारी (Collector) तसेच मनपा आयुक्त यांनी दिले आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
रविवारची शाळा ऐच्छिक
शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. सर्व आस्थापना/ कार्यक्रमावरील कोरोना विषयक निर्बंध टप्या-टप्याने उठविण्यात येत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी सदर आदेश देण्यात आलेले आहेत. रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सुरु ठेवता येईल. इयत्ता पहिली ते नववी व इयत्ता अकरावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा एप्रिल महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात घेण्यात याव्यात. निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात यावा. सकाळच्या सत्रात शाळा घेण्यात येणार आहेत.
पाहा ट्वीट
#नागपूर जिल्ह्यातील पहिली ते नववी व अकरावीच्या मनपा -जिल्हा परिषदे शाळांचे सर्व वर्ग १ एप्रिलपासून सकाळी ७ ते १२ सुरु असतील : जिल्हाधिकारी @vimshine @NitinRaut_INC @SunilKedar1111 @MahaDGIPR @InfoVidarbha pic.twitter.com/8h6AxtuyBf
— DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR (@InfoNagpur) March 30, 2022
जिल्हा व शहरातील शाळांना आदेश लागू
अध्यापनाच्या तासिका पूर्णवेळ शाळेप्रमाणे घेण्यात याव्यात. तसेच दररोज शंभर टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले आहे. या आदेशांचे पालन मनपा क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी करावे, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. तर जिल्ह्यातील सर्व शाळांनी या नियमांच पालन करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केलं आहे.