Super | सुपरमध्ये यंत्रदुरुस्तीसाठी निधीची अडचण!, का रखडल्या शस्त्रक्रिया?
सुपर स्पेशाटिलीमध्ये कॅथलॅब, फॅब्रोस्कॅनसह विविध प्रकारचे यंत्र आहेत. यंत्राच्या देखभालीसाठी दरवर्षी दीड कोटी रुपयांचा निधी लागतो.
नागपूर : गरिबांचे रुग्णालय अशी सुपर, मेडिकलची ओळख. पण, यंत्रांची दुरुस्ती होत नाही. त्यामुळं शस्त्रक्रियांना थांबा द्यावा लागतो. अशाच प्रकार आणखी पुढे आला. तो म्हणजे सुपरमधील कॅथलॅब बंद असल्याचा. यामुळं महत्त्वाच्या शस्त्रक्रिया अडकल्या आहेत.
देखभालीसाठी दरवर्षी दीड कोटींचा निधी
सुपर स्पेशाटिलीमध्ये कॅथलॅब, फॅब्रोस्कॅनसह विविध प्रकारचे यंत्र आहेत. यंत्राच्या देखभालीसाठी दरवर्षी दीड कोटी रुपयांचा निधी लागतो. यासाठी सीएनसी, एएनसी करावी लागते. मात्र विदर्भातील शासकीय रुग्णालयांतील यंत्रांच्या देखभालीचा निधी राज्य शासनाकडून मिळत नाही. कंपनीशी एएनसी आणि सीएनसीचा करार आहे. पण, पैसे न दिल्याने करार संपुष्टात येतो. यामुळे कॅथलॅब किंवा इतर यंत्र बंद पडल्यानंतर कंपनीकडून यंत्र दुरुस्तीसाठी अडवणूक होते.
50 जणांच्या एन्जिओप्लास्टी होणे बाकी
गेल्या पंधरा दिवसांपासून कॅथलॅब बंद आहे. कॅथलॅबच्या डिस्प्लेमधील एक पार्ट निकामी झाला आहे. तो पार्ट मागवला आहे. पण, पंधरा दिवसांनंतरही कंपनीकडून प्रतिसाद मिळत नाही. परराज्यातून आलेले रुग्ण आल्यापावली परततात. आतापर्यंत 200 हून अधिक रुग्णांच्या एन्जिओग्राफी होऊ शकल्या नाही. तर 50 जणांच्या एन्जिओप्लास्टी होणे बाकी आहे. सुपरमध्ये 1998 पासून आजतागायत तब्बल 40 हजारांवर गरीब रुग्णांच्या ह्रदयावर ऍन्जिओग्राफी, ऍन्जिओप्लास्टी झाली. पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेतून सुपर स्पेशालिटीच्या ह्रदयरोग विभागात 4 कोटी 80 लाख रुपये खर्चून नवीन कॅथलॅब लावली. एफपीडी, एफएफआर, आयव्हीयुएससारख्या गुणात्मक बदलातून सुपरचा हृदय विभाग चांगला झाला. पण, यंत्रांअभावी डॉक्टर काही करू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे.