Nagpur | सामूहिक बलात्कार प्रकरण : अडीच महिन्यांपासून आरोपी फरार; कसे आले पोलिसांच्या जाळ्यात?
पीडितेच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पण, आरोपींचा पत्ता लागत नव्हता. पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनात खबरे कामाला लावण्यात आले. त्यांच्याकडून माहिती मिळाली.
नागपूर : मित्र-मैत्रीण निर्जन स्थळी बसले होते. मित्राला मारहाण करून हाकलून लावले. त्यानंतर युवतीवर तिघांनी अंधाराचा फायदा घेऊन बलात्कार केला. आरोपी निघून गेले. त्यांचा पत्ता लागत नव्हता. अडीच महिन्यांनंतर खबऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला.
रात्रीच्या वेळी मित्रासोबत निर्जन ठिकाणी बसलेल्या युवतीवर सामूहिक बलात्कार करून फरार झालेल्या तीन आरोपींच्या मुसक्या बांधण्यात अखेर एमआयडीसी पोलिसांनी यश मिळवले. शिवेंद्र सुरेश पटेल, अजय राधेलाल म्हात्रे आणि सूरज घनश्याम कुशवाह अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
काय आहे प्रकरण
पीडित युवती निर्जन स्थळी मित्रासोबत बसली होती. दोन ऑक्टोबरला रात्रीच्या अंधारात त्यांनी रोमांसचा आनंद घेतला. त्यानंतर माधवनगरीजवळून घराकडं परत येत होते. तेवढ्यात तीन टपोरी पोरं तिथं आले. त्यांनी पीडितेचा मित्र आकाश भंडारीला (रा. इसासनी) मारहाण केली. आकाशचा मोबाईलही हिसकावला. पीडितेवर अत्याचार केला. त्यानंतर तिला एकटीला सोडून ते निघून गेले. एका स्थानिक नेत्याने एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
खबऱ्यांची झाली मदत
पीडितेच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पण, आरोपींचा पत्ता लागत नव्हता. पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनात खबरे कामाला लावण्यात आले. त्यांच्याकडून माहिती मिळाली. या आधारावर ठाणेदार उमेश बेसरकर, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, सहाय्यक निरीक्षक रमेश हत्तीगोटे, दीपक दासरवार, राजाराम ढोरे, हवालदार विजय काळे, नायक जितेंद्र खरपुरिया, दीपक सराटे, पंकज मिश्रा आणि इस्माईल यांनी आरोपींना बेड्या ठोकल्या.
आरोपी होते बिनधास्त
यातील अजय म्हात्रे हा बालाघाटला निघून गेला. शिवेंद्र पटेल व सूरज कुशवाह हे आपल्याला कुणी बघीतले नाही म्हणून बिनधास्त होते. पोलीस आता अटक करणार नाही. असे त्यांना वाटले. पण, शोध लागल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. घटना घडून अडीच महिने झाले होते.